क्राईम

मॉडेल बनवण्याचे आमिष दाखवून केले लैंगिक शोषण!

2 August :- सध्याच्या तरुण पीडीमध्ये मॉडलिंग करण्याचे स्वप्न पाहणे ही सामान्य गोष्ट बनली आहे.सध्याचे तरुण-तरुणी मोठ्या संख्येमध्ये मॉडलिंग क्षेत्रात करिअर करण्यास उत्सुक असतात.अनेकजण या मॉडलिंग क्षेत्रातील स्पर्ध्येत टिकतात तर अनेकजण मॉडलिंग क्षेत्रातील स्पर्ध्येतून बाद होतात.अनेक तरुणींची फसवणूक देखील झल्याच्या बातम्या आजवर कानावर आहेत.अनेक तरुणींचे लैंगिक शोषण देखील केलं जाते तर अनेक तरुणांचे पैसे देखील लाटले जातात. अशीच एक घटना घडली आहे.

मॉडलिंगमध्ये करिअर करण्याचं स्वप्न पाहाणाऱ्या तरुणींना ब्यूटी कॉन्टेस्टमध्ये सहभागी करून घेण्याच्या नावाखाली त्यांचं लैंगिक शोषण आणि ब्लॅकमेलिंगचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी राष्ट्रीय महिला आयोगाकडे दिलेल्या तक्रारीनुसार चंडीगड येथील आयएमजी व्हेंचर्स नामक कंपनीचा प्रमोटर सनी वर्माविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीनं मॉडलिंगमध्ये करिअर करण्याची संधी देण्याचं आमिष दाखवून अनेक तरुणींना ब्लॅकमेल करून त्यांचं लैंगिक शोषण केलं आहे.

पीपुल अगेंस्ट रेप इन इंडिया सामाजिक कार्यकर्त्या योगिता भयाना यांनी या प्रकरणी राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा रेखा शर्मा यांच्याकडे लेखी तक्रार दिले आहे. आरोपी सनी वर्मा हा आपल्या कंपनीच्या माध्यमातून ‘मिस एशिया’ ब्यूटी कॉन्टेस्टचं आयोजन करून उच्चभ्रु तरुणींना आपल्या जाळ्यात अडकवत होता. या कॉन्टेस्टसाठी सहभागी करून घेण्यासाठी कंपनी तरुणींकडून 2,950 रुपये एंट्री फी देखील घेत होती. कॉन्टेस्टमध्ये बेस्ट रॅंकिंग मिळवण्यासाठी सनी वर्मा महिला सहकाऱ्यांच्या माध्यमातून स्पर्धक तरुणींचे न्यूड फोटो मागवत होता.

सनीकडे तरुणींचे न्यूड फोटो आल्यानंतर तो थेड संबंधित तरुणीशी संपर्क करून त्यांना सिलेक्शनचं प्रलोभन दाखवून आणखी न्यूड फोटो आणि व्हिडिओची डिमांड करत होता. एवढंच नाही तर सनी वर्मा हा तरुणींना वारंवार ब्लॅकमेल करून त्यांचं लैंगिक शोषण करत होता.देशभरात अनेक तरुणी सनी वर्मा आणि त्याच्या सहकाऱ्यांच्या आमिषाला बळी पडल्या आहेत. आरोपीच्या त्रासाला कंटाळून अनेक पीडित तरुणींनी पत्र, मेसेज आणि ऑडिओ क्लिप पाठवून सनी वर्मा आणि त्याच्या कंपनीचा गोरखधंद्यांच्या भंडाफोड केला आहे.राष्ट्रीय महिला आयोगाने आरोपी सनी वर्माविरुद्ध लैंगिक शोषणाची तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणी बॉलीवूडमधील नामी हस्तींनाही नोटिस बजावली आहे. आरोपी सनी वर्मा याला आधीच पोलिसांनी अटक केली आहे.