बीड

नवनीत राणांच्या घरात कोरोनाचा शिरकाव!

2 August :- देशभरात कोरोना विषाणूने थैमान घातले आहे.सर्व सामान्य माणसांसह मोठी मोठी सेलिब्रेटी,अभिनेते,खेळाडू,राजकीय नेते,प्रशासकीय अधिकारी सुद्धा कोरोनाच्या चपेटीत अडकले आहेत. आता कळलेल्या माहितीनुसार खासदार नवनीत राणा यांच्या देखील घरात कोरोनाचा शिरकाव झाला आहे.या पार्श्वभूमीवर राणा यांच्या कुटुंबातील सर्व सदस्य व कार्यकर्ते अशा जवळपास 50 ते 60 जणाची कोरोना चाचणी घेण्यात येत आहे.

आमदार रवी राणा यांच्या घराचा संपूर्ण परिसर सॅनिटाईज करण्यात येणार असल्याची माहिती आरोग्य विभागाच्या सूत्रांनी दिली आहे. या आधी रवी राणा आणि नवनीत राणा यांचीही कोरोना चाचणी घेण्यात आली होती. मात्र, राणा दाम्पत्यांचं चुकीचे थ्रोट सॅम्पल घेतल्याने मोठा गोंधळ उडाला होता. अमरावती जिल्हा प्रशासन आरोग्य विभागाच्या हलगर्जीपणाबाबत आमदार रवी राणा यांनी थेट राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचेकडे तक्रार केली होती.