सिनेमा,मनोरंजन

महानायकाची कोरोनाच्या तावडीतून सुटका!

2 August :- हिंदी चित्रपट सृष्टीतील महानायक म्हणून संबोधले जाणारे जेष्ठ अभिनेते काही दिवसापूर्वी कोरोनाच्या चपेटीत सापडले होते.महानाय अमिताभ स्वतः आणि त्यांचे कुटुंब सुद्धा कोरोनाच्या घेऱ्यात आले होते.आभिषेक बच्चन,ऐश्वर्या राय,आराध्य बच्चन सर्वांना कोरोनाची लग्न झाली होती मात्र चाहत्यांच्या आणि सर्वांच्या प्रार्थनेने महानायक अमिताभ सध्या कोरोनमुक्त झाले आहेत.

महानायक अमिताभ बच्चन यांची कोरोना चाचणी नेगिटिव्ह आली आहे. त्यांना आजच घरी देखील सोडण्यात येणार आहे. अमिताभ बच्चन यांना थोड्याच वेळात नानावटी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात येणार आहे. यानंतर त्यांचे चाहते आनंद व्यक्त करत आहेत. याआधी अमिताभ यांची सुन अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन आणि नात आराध्या बच्चन यांचा देखील कोरोना अहवाल निगेटिव्ह आला होता. त्यामुळे बच्चन कुटुंबावर असलेलं कोरोनाचं संकट दूर होऊ लागलं आहे.