News

मोठी बातमी! चिनी TikTok ला अमेरिकेत Microsoft करणार खरेदी

नवी दिल्ली, 01 ऑगस्ट : देशभरात 2019 आणि 2020 मध्ये TikTok हा व्हिडिओ अॅप सगळ्यांच्या पसंतीस उतरला होता. भारतात मोठ्या प्रमाणात हा अॅप वापरला जात होता. पण आता मात्र या अॅपचे वाईट दिवस सुरू आहे. भारताने बंदी घातल्यानंतर आता अमेरिकासुद्धा या अॅपवर बंदी घालण्याच्या तयारीत आहे. यावर डोनाल्ड ट्रम्प हे लवकरच निर्णय घेणार असल्याची माहिती समोर येत आहे. मेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (US President Donald Trump) चिनी अ‍ॅप टिक टॉकवर बंदी घालण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे. यासाठी ते बर्‍याच पर्यायांवर विचार करत आहे.

भारताने टिकटॉकसह 106 चिनी अॅप्सवर बंदी घातली असून अमेरिकन प्रशासन आणि इतर खासदारांनी या निर्णयाचं स्वागत केलं. ट्रम्प यांनी माध्यमांशी बोलताना सांगतलं की, आम्ही काहीही करु शकतो. चीनला धडा शिकवण्यासाठी आमच्याकडे खूप पर्यात आहे. परंतु यादरम्यान बर्‍याच गोष्टी घडत आहेत, त्यामुळे काय होतं ते पहावं लागेल. पण टिकटॉकवर बंदी आणण्यासाठी आम्ही इतर पर्याय शोध असल्याचं ट्रम्प म्हणाले.

Microsoft विकत घेणार TikTok

वॉल स्ट्रीट जर्नल या अमेरिकन वृत्तपत्रानुसार, मूळचे भारतीय असलेले अमेरिकन सत्य नडेला यांच्या नेतृत्वात मायक्रोसॉफ्ट कंपनी TikTok ला अमेरिकन व्यवसायात हस्तगत करण्याचा विचार करत आहे. कोट्यवधी डॉलर्सचा हा करार असू शकतो. खरंतर, बॅन होण्यापेक्षा आपला अॅप विकलेला बरा यावर चीन जोर देईल. त्यामुळे मायक्रोस्पॉफ्ट टिकटॉकला खरेदी करू शकतं.

जगभर कोरोना (Coronavirus Pandemic) शिरकाव झाल्यापासून ट्रम्प हे चीनवर खूप चिडले आहेत. संपूर्ण देश कोरोनाच्या महामारीचा सामना करत असतानाही चीन आपल्या खुरापती काही थांबवत नाही. त्यामुळे भारताकडून चीनशी संबंधित कंपन्यांवर थेट बंदी घालण्यात आली. भारताने गेल्या आठवड्यात चीनच्या आणखी 47 अ‍ॅप्सवर बंदी घातली होती. भारत सरकारने याआधीही चीनमधील 59 अॅप्सवर (59 Apps Banned in India) बंदी घातली आहे. ज्यात टिक टॉकचा समावेश आहे.

बंदी घातलेल्या अ‍ॅप्समध्ये मुख्यतः क्लोनिंग अॅप्सचा समावेश असतो. म्हणजे, आधी अ‍ॅप बन केले गेले. त्यानंतर या अ‍ॅप्समधून वापरकर्त्यांचा डेटा चोरीचा आरोप समोर आला. अशात गलवान खोऱ्यात मोठी चकमक झाली. यानंतर मात्र भारताने चिनी अ‍ॅप्सविरूद्ध मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यास सुरवात केली.

CNBC ने दिलेल्या माहितीनुसार, अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प TikTok वर लवकरच मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहेत. यासंबंधीचा आदेश कधीही येऊ शकतो. आम्ही TikTok वर नजर ठेऊन आहोत. लवकरच यावर बंदी घातली जाऊ शकते. यावर आम्ही आणखी काही निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याचं ट्रम्प म्हणाले आहेत.