फडणवीसांना सुरु केलेली योजना ठाकरे सरकारने बंद केली
31 July :- कोरोना विषाणूचा वाढत्या कहरामुळे राज्यात मोठे आर्थिक संकट उभा राहिले आहे.त्यामुळे फडणवीसांना सुरु केलेली योजना बंद करत असल्याचं सरकारने म्हटलं आहे.माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना आणीबाणीच्या काळात ज्यांनी तुरुंगवास भोगला अशा कार्यकर्त्यांना पेंशन देण्याचा निर्णय घेतला होता.राज्यावर कोरोनपरुपी संकटामुळे उभा राहिलेले आर्थिक संकट लक्षात घेत ठाकरे सरकारने हि योजना बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.
माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी आणीबाणी लादण्याच्या निर्णयाविरोधात भाजपसह त्यावेळीच्या अनेक नेत्यांनी सहभाग घेत आंदोलन केलं होतं. आणीबाणी ही लोकशाहीची हत्या होती असा आरोप करत भाजप अजुनही काँग्रेसला टार्गेट करत असते. त्यामुळे काँग्रेसचा या योजनेला विरोध होता. त्यामुळेच सरकारने हा निर्णय घेतल्याची चर्चा आहे.या आधीही ठाकरे सरकारने फडणवीसांच्या काळात घेतलेले अनेक निर्णय फिरवले होते. सत्तेत आल्यानंतर काही दिवसांनीच काँग्रेसच्या मंत्र्यांनी या योजनेला विरोध केला होता. त्यामुळे या योजनेचं भवितव्य अधांतरीच होतं.यावरून आता भाजप शिवसेनेला टार्गेट करण्याची शक्यता आहे.
काँग्रेसच्या सांगण्यावरून शिवसेनेने हा निर्णय घेतला अशीही टीकाही करण्यात येत आहे. आपल्याला विचारून निर्णय घेतले जात नाही असं काँग्रेसचं म्हणणं होतं. त्यामुळे काँग्रेसचे नेते नाराजही होते. ती नाराजी दूर करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हा निर्णय घेतल्याचं बोललं जात आहे. हा निर्णय भाजपच्या वैचारिक तत्वांना पुढे ठेवून निर्णय घेतला होता. ठाकरे सरकारने तोच निर्णय फिरवल्याने हा भाजप आणि देवेंद्र फडणवीसांसाठी धक्का मानला जातोय.