राजकारण

लॉकडाऊन बाबत गडकरींचे महत्वपूर्ण वक्तव्य!

31 July :- कोरोना विषाणूचा वाढत प्रादुर्भाव लक्षात घेता अनलॉक ३ ची नवीन नियमावली जाहीर झाली.मात्र सतत वाढणाऱ्या लॉकडाऊनमुळे सर्वसामान्य जनतेच्या हाताला काम मिळत नसल्याने सर्व सामान्य माणसांना मोठ्या आर्थिक संकटांना तोंड द्यावे लागत आहे.सध्य परिस्थितीमध्ये सर्व सामान्य माणसांचे एक वेळस जेवण्याचे देखील वंदे झाले आहेत.तर अनेकांना उपासमारिचा देखील सामना करावा लागत आहे. आशा भयाण परिस्थितीमध्ये लॉकडाऊन करणे उपाय उपाय नसल्याचे वक्तव्य नितीन गडकरींनी केले आहे.

कोरोनाचं संकट आज जगावर आहे. या संकटाचा सामना हिमतीने करण्याची गरज आहे. कोरोनासोबत जगण्यासाठी सकारात्मक आणि आत्मविश्वास सगळीकडे निर्माण करण्याची आवश्यकता आहे, असं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलं. कोरोनाचं संकट आहे पण लॉकडाऊन सुरु ठेवणे बंद केलं पाहिजे. आज लॉकडाऊनमुळे अनेक समस्या उद्भवत आहेत. लोकांचा पोटापाण्याचा प्रश्न निर्माण होत आहे. त्यामुळे कोरोनापासून बचावाचे नियम पाळून आपण जनजीवन सुरळीत केलं पाहीजे, असं नितीन गडकरी यांनी म्हटलं.लॉकडाउन वाढवला गेला तर मोठ्या प्रमाणावर आर्थिक संकट येतील.

कोरोनावरची लस मिळेपर्यंत तारेवरची कसरत करावीच लागेल. सोशल डिस्टन्सिंग, हात धुणे, मास्क लावणे हे उपाय योजून उद्योग सुरु करावेच लागतील. संपूर्ण लॉकडाउन योग्य नाही, असंही नितीन गडकरींनी सांगितलं. कोरोनाचं संकट जगावर आहे. मात्र लॉकडाउन करणे हा एकमेव उपाय असं कुणीही ठामपणे सांगू शकत नाही. संक्रमण न वाढता आपलं जीवन सुरळीत करणं हे आव्हान आपल्याला पेलावचं लागणार आहे असं नितीन गडकरींनी सांगितलं.