बीड

अबब..! तंबाखूपासून बनवली कोरोना लस

31 July :- जगभरात कोरोना विषाणूचे थैमान सुरु आहे.कोरोना विषाणूने फक माणसांचे स्वस्थच खराब नाही केलं तर जगभरातील आर्थिक व्यवस्थेचं कंबरडं कोरोनाने मोडले आहे.जगभरात सर्वत्र एकच प्रश्न आणि प्रतीक्षा आहे.ती म्हणजे कोरोनावर मात करण्याकरिता प्रभावी लस कधी तयार होणार? जगभरात कोरोनावर मात करण्याकरिता प्रभावी लस तयार करण्याचे काम युद्ध पातळीवर सुरु आहे.जगभरात सध्या शेकडो कोरोना लशी तयार करण्यात आल्या आहेत. त्यापैकी काही लशींची प्राण्यांवरील चाचणी यशस्वी ठरली आहे. तर काही लशी ह्युमन ट्रायलच्या टप्प्यात आहेत.सध्याची परिस्थिती आणि गरज लक्षात घेता काही तंबाखू आणि त्यापासून उत्पादन तयार करण्याऱ्या कंपन्याही कोरोना लशीच्या स्पर्धेत उतरल्या.

अशाच एका कंपनीने तंबाखूपासून कोरोनाची लस तयार केल्याचा दावा केला आहे आणि आता मानवी चाचणीची तयारी सुरू केली आहे.ब्रिटिश अमेरिकन टोबॅको जगातील सर्वात मोठी सिगारेट उत्पादक कंपनी आपल्या संभाव्य कोरोना लशीचं ह्यमुन ट्रायल सुरू करण्याच्या तयारीत आहे. लाइव्ह मिंटने ब्लूमबर्गचा हवाला देत हे वृत्त दिलं आहे.लकी स्ट्राइक सिगारेट बनवणाऱ्या लंडन स्थित या कंपनीने तंबाखूच्या पानांमधील प्रोटिन आणि कोरोनाचा जीनोम वापरून ही लस तयार केल्याचं सांगितलं.

फिलिफ मॉरिस इंटरनॅशनलची मेडिकागो इनकॉर्पोरेशन कंपनीदेखील तंबाखूपासून कोरोनाची लस तयार करते आहे. पुढील वर्षाच्या सहा महिन्यात ही लस येईल असा दावा या कंपनीने केला आहे.जगभरात सध्या 24 कोरोना लशींचं क्लिनिकल ट्रायल सुरू आहे. यांच्या यशस्वीतेचा दर आतापर्यंत 10 टक्केच दिसून आल्याची माहिती जागतिक आरोग्य संघटनेच्या शास्त्रज्ञ सौम्या स्वामीनाथन यांनी सांगतिलं.