महाराष्ट्र

राज्यात रुग्ण बरे होण्याचा वेग वाढतोय;मात्र रुग्णवाढ उच्चांकी

31 July :- राज्यात रुग्ण बरे होण्याचा वेग दिवसेंदिवस वाढतो आहे.कोरोनाबाधित रुग्ण संख्या वाढत असली तरी राज्यात रुग्ण बरे होण्याची संख्या देखील वाढत चालली आहे.कोरोनाबाधित रुग्णांच्या वाढत्या आकडेवारीमुळे राज्यभरात नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालेले आहे.मात्र गेल्या चार-पाच दिवसांपासून रुग्ण बरे होण्याच्या संख्येत झालेली वाढ प्रशासनाला आणि नागरिकांना दिलासा देणारी आहे.

आज राज्यात 7543 रुग्ण बरे होऊन घरी गेलेत. राज्याचं रुग्ण बरे होण्याचं प्रमाण 60.68 टक्के आहे. 2 लाख 65 हजार 158 रुग्ण पूर्णपणे बरे झाले आहेत.राज्यात आज पुन्हा एकदा विक्रमी 10 हजार 320 नवे रुग्ण आढळून आलेत. राज्यात सध्या तब्बल दीड लाख सक्रिय रुग्ण आहेत.तर 265 जणांचा करोना मुळे मृत्यू झाला.