बीड

महाविकास आघाडीचं सरकार हे लिव्ह-इन रिलेशनशिप – देवेंद्र फडणवीस

31 July :- राजकारण म्हणलं को आरोप-प्रत्यारोप आलेच.राज्यातील महाविकास आघाडीच्या सरकारवर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस नियमाची टीका,प्रश्न करताना दिसतात वृत्त वाहिन्यांशो बोलत असताना फडणवीस म्हणाले कि ‘ठाकरे सरकार पाडण्यासाठी आम्ही कुठलेही प्रयत्न करणार नाही. आम्हाला त्यात अजिबात रस नाही. सध्या महामारीचा काळा आहे, महामारीची लढाई सुरु आहे. आम्ही आमच्यापरीने, क्षमतेने करोना संकटाशी लढतोय. पण माझं एक ठाम मत आहे. देशाच्या पाठीवर अशा प्रकारचं सरकार कधीच चाललं नाही. सर्वात महत्त्वाचं म्हणजे, यामध्ये काँग्रेस आहे. काँग्रेसनेही याप्रकारचं सरकार कधीही चालू दिलं नाही. त्यामुळे देशाचा राजकीय इतिहास हा महाराष्ट्रात बदलेलं, असं आतातही यांच्यात दिसत नाही.

पुढे म्हणाले की, ‘महाविकास आघाडी सरकारमधील वादविवाद खूप टोकाला गेले आहेत. हे कुटुंब आहे ते दुभंगलेलं आहे. याला कुटुंब म्हणूच शकत नाही. हे सरकार म्हणजे लिव्ह इन रिलेशनशिप आहे. अंर्तविरोधामुळेच हे सरकार पडेल आणि ज्या दिवशी हे सरकार पडेल त्यादिवशी आमच्यावर जबाबदारी येईल आणि आम्ही एक मजबूत सरकार महाराष्ट्राला देऊ.’फडणवीस म्हणाले. ‘सध्याचं सरकार म्हणजे एक ट्रेन आहे, अनेकदा ट्रेनला मागे इंजिन असतं, एक पुढे असतं, पण याला मध्येही एक इंजिन आहे. आणि तिघेही आपापल्या दिशेने ते इंजिन ओढत आहेत.’, असंही ते म्हणाले.