भारत

भारतातील मोबाईल युगाची सिल्व्हर ज्युबिली!

31 July :- आजच्या युगातील मानवी जीवनातील अविभाज्य घटक म्हणजे ‘मोबाईल’.मानवाच्या मूलभूत गरजा अन्न,वस्त्र,निवारा आहेत.मात्र आजच्या युगातील मोबाईलचा वापर आणि आवश्यकता पाहून नक्कीच म्हणतात येईल कि मानवाच्या मूलभूत गरजा अन्न,वस्त्र,निवारा आणि मोबाईल आहे.आजच्या युगात कुठलेही काम मोबाईल विना शक्य होत नाही.मोबाईलमुळे मोठ्यात मोठं काम सहज शक्य होऊन जात. नव्हे मोबाईलमुळे मोठ्यात मोठं काम अडकून देखील राहतं.मोबाईल सेवेमुळे अख्ख जग जवळ आलं आहे.मानवी आयुष्यातील आत्यावश्यक असणाऱ्या मोबाईलला सुरु होऊन भारत देशात आज तब्ब्ल 25 वर्ष पूर्ण झाले आहेत.

31 जुलै 1995 देशात मोबाईलवरून पहिलं संभाषण झालं होतं. पश्चिम बंगालचे तत्कालीन मुख्यमंत्री ज्योती बसू आणि तत्कालीन केंद्रीय दूरसंचारमंत्री सुखराम यांच्या मोबाईलवरून पहिलं संभाषण झालं होतं.आज मोबाईल संवादाचं प्रमुख साधन बनलं आहे. मोबाईलमध्ये देशात नवी क्रांती झाली. त्यावेळी मोबाईलवरून संवाद साधने बरंच खर्चिक होतं. आज आपण सहजतेने मोबाईवर तासंतास बोलत असलो तरी, तेव्ही तेवढं शक्य नव्हतं. कारण मोबाईलवर बोलण्यासाठी इनकमिंग आणि आऊटगोईंग दोन्हीसाठी चार्ज लागत होता.आजच्या दिवशी सध्य परिस्थितीमध्ये जवळपास सर्वांकडेच मोबाईल आहे.

ज्योती बसू यांनी कोलकाताच्या रायटर्स बिल्डिंगमधून पहिला कॉल नवी दिल्लीतील दूरसंचार भवनमध्ये पहिला कॉल केला होता. भारतातील पहिली मोबाईल ऑपरेटिंग कंपनी मोदी टेल्स्ट्रा होती आणि या कंपनीच्या सर्व्हिसला मोबाईल नेटने ओळखलं जायचं. पहिला मोबाईल कॉल याच नेटवर्कवरुन केला गेला होता. मोदी टेल्स्ट्रा भारतातील मोदी ग्रुप आणि ऑस्ट्रेलियाच्या टेलिकॉम कंपनी टेल्स्ट्रा कंपनीचं ज्वॉईंट वेन्चर होतं. त्यावेळी 8 कंपन्यांना देशात सेल्यलर सर्विस प्रोव्हाईड करण्याची मंजुरी देण्यात आली होती, त्यापेकी ही एक कंपनी होती.