राजकारण

लॉकडाऊनविरोधात आंबेडकरांची आक्रमक भूमिका!

31 July :- कोरोना विषाणूचा वाढत प्रादुर्भाव लक्षात घेता अनलॉक ३ ची नवीन नियमावली जाहीर झाली.मात्र सतत वाढणाऱ्या लॉकडाऊनमुळे सर्वसामान्य जनतेच्या हाताला काम मिळत नसल्याने सर्व सामान्य माणसांना मोठ्या आर्थिक संकटांना तोंड द्यावे लागत आहे.सध्य परिस्थितीमध्ये सर्व सामान्य माणसांचे एक वेळस जेवण्याचे देखील वंदे झाले आहेत.तर अनेकांना उपासमारिचा देखील सामना करावा लागत आहे. आशा भयाण परिस्थितीमध्ये वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी लॉकडाऊनविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे.

आंबेडकर म्हणाले,’लॉकडाऊन मान्य करू नका. राज्यातील सर्व दुकाने 1 तारखेपासून उघडा,’ असं आवाहन त्यांनी दुकानदारांना केलं आहे. त्याचवेळी ‘पाहिजे तर मला अटक करा. माझ्यावर गुन्हा दाखल करा, मी घाबरत नाही,’ असं म्हणत राज्य सरकारलाही आव्हान दिलं आहे.’देशात आपल्या लोकसंख्येपैकी केवळ 5 टक्के लोक कोरोनामुळे बाधित होऊ शकतात आणि केंद्र आणि राज्य सरकार 95 टक्के लोकांवर अन्याय करीत आहेत.

येत्या 1 तारखेपासून सर्वांनी आपापली सर्व दुकाने उघडून व्यवहार करावेत. बकरी ईद मुस्लीम बांधवांनी मोकळेपणाने साजरी करावी आणि रक्षाबंधनही व्यवस्थित मोकळेपणाने साजरे करावं,’ असं आवाहनही प्रकाश आंबेडकर यांनी औरंगाबादमध्ये बोलताना केलं आहे.