बीडमध्ये ऑनलाईन डान्स क्लासेसला प्रारंभ!
३१ जुलै – जिल्ह्यात सर्वत्र कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता कालच अनलॉक ३ ची नवीन नियमावली जाहीर झाली आहे.अनलॉक ३ च्या नवींन नियमावलीमध्ये शाळा,कॉलेज बंद ठेवण्यात येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून अनेक शाळांनी ऑनलाईन शाळा भरवल्या आहेत.आणि या ऑनलाईन शिक्षण पद्धतीला पालकांनी आणि मुलांनी सुद्धा उस्फुर्तपणे प्रतिसाद दिला आहे.कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर घरबसल्या ऑनलाईन शिक्षण पद्धतीमुळे मुलांच्या दैनंदिन शारीरिक हालचाली बंद झाल्या आहेत.कोरोनाच्या वाढत्या संक्रमणामुळे मुलांचे मैदानी खेळ सुद्धा बंद झाले आहेत.दिवसभर मुलं घरात बसून असल्याने शारीरिक कसरतीस पूर्णतः विराम मिळाला आहे.
दरम्यान याच सर्व गोष्टींचा विचार करत कोरोनारूपी महासंकटातून सुवर्णमध्य काढत खास मुलांच्या आणि पालकांच्या आग्रहास्तव बीड जिल्ह्यातील सांस्कृतिक क्षेत्रात लोकप्रिय आणि नामांकित असलेले नृत्यांगण डान्स क्लासेस आणि ताराहर डान्स स्टुडिओ एकत्रित मिळून येत्या 1 ऑगस्ट 2020 पासून सायंकाळच्या वेळी ऑनलाईन डान्स क्लासेस सुरु करत आहेत.मुलांच्या अंगातील सुप्त कलागुणांना वाव देण्याकरिता नेहमीच अग्रेसर असणारे नृत्यांगण डान्स क्लासेस आणि ताराहर डान्स स्टुडिओ बीड जिल्ह्यातील नृत्यक्षेत्रात पहिल्यांदाच एक आगळा-वेगळा प्रकल्प राबवत आहे.
नृत्यांगण ताराहर डान्स स्टुडिओ ऑनलाईन डान्स क्लासेसमध्ये मुलांना घरबसल्या झूम अँप च्या सहाय्याने मुलांना ऑनलाईन डान्स शिकवण्यात येणार आहे.बीड जिल्ह्यातील कुठल्याही तालुक्यातून मुलं या ऑनलाईन डान्स क्लासेसमध्ये प्रवेश घेऊ शकतात.या ऑनलाईन डान्स क्लासेसमध्ये प्रवेश घेण्याकरिता कुठलीही वयाची मर्यादा नाही.लहानली मुलं,महिला,पुरुष या ऑनलाईन डान्स क्लासेसमध्ये प्रवेश घेऊ शकतात.
या ऑनलाईन डान्स क्लासेसमध्ये मुलांची शरीरीक कसरत वाढवण्याच्या दृष्टीने एरोबिक फिटनेस डान्स,झुंबा डान्स शिकवण्यात येणार असून मुलांना इतरत डान्स प्रकार सुद्धा शिकवण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.एरोबिक फिटनेस डान्समुळे मुलांच्या शारीरिक कसरती होणार आणि यामुळे निश्चितच मुलांमधील रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते.ऑनलाईन डान्स क्लासेसमुळे गेल्या अनेक दिवसांपासून घरात बसलेल्या मुलांचे डोकं,मन,अंग मोकळे होऊन मुलांमध्ये उत्साह आणि नवचैतन्य निर्माण होणार.एरोबिक फिटनेस डान्समुळे मुलांची नैराश्य दूर होण्यास मदत होणार.एरोबिक फिटनेस डान्समुळे घरात बसलेल्या मुलांची भुकक्षमता वाढण्यास आणि पचनक्रिया सुधारण्यास मदत होणार.या सर्व गोष्टींचा विचार करून बीड जिल्ह्यातील अनेक अनेक सुज्ञ पालकांनी,महिलांनी या ऑनलाईन क्लासेसमध्ये प्रवेश घेतला आहे.
नृत्यांगण ताराहर डान्स स्टुडिओ च्या ऑनलाईन डान्स क्लासेसची प्रवेश प्रक्रिया सुरु झाली असून या ऑनलाईन डान्स क्लासेसमध्ये प्रवेश करण्याकरिता या फोन नंबर वर संपर्क साधावा प्रतिक कांबळे- 9511798555 , रोहित ताराहर 82080 13582