तिने प्रियकरासाठी स्वत: च्याच घरात केली चोरी!
30 July :- सध्य परिस्थितीमध्ये समजत अनेक विचित्र घटना घडत आहे.समाजात विचित्र घडणाऱ्या घटनांमुळे आश्चर्य आणि संताप व्यक्त केला जात आहे.अशीच एक चोरीची अशचर्यजनक घटना भिवंडी येथील नारपोली पोलीस ठाणे हद्दीतील कामतघर येथील अष्टविनायक बिल्डिंगमधील एका फ्लॅटमध्ये दिवसाढवळ्या घडली आहे.बंद असलेल्या घराची बनावटी चवीच्या सहाय्याने घरातील सुमारे 13 लाख 21 हजार रुपये किमतीचे सोने-चांदीचे दागिने व रोख रक्कम चोरीला गेली होती. याप्रकरणी पोलिसांनी धक्कादायक खुलासा केला आहे.
सुवर्णा सोनगीरकर या महिलेने 22 जुलै रोजी नारपोली पोलीस ठाण्यात घरात चोरी झाल्याची तक्रार दिली होती.या चोरीमागचा करता करविता दुसरा तिसरा कोण्ही नसून घरमालकाची मुलगी आणि तिचा प्रियकर आहे.आरोपी तरुणी ही वैद्यकीय शिक्षण घेत आहे. तिला प्रियकरसोबत पळून जाऊन लग्न करायचं होतं. यासाठी तिनं प्रियकराच्या मदतीनच स्वत: च्याच घरात डल्ला मारला. पोलिसांनी तरुणीसह तिच्या प्रियकरासह अटक करण्यात आली आहे. तरुणीला घरातूनच तर प्रियकराला धुळ्यातून ताब्यात घेतलं आहे. भिवंडी पोलिसांनी ही कारवाई केली.