Popular News

सुखद बातमी! ऑगस्टमध्येच येणार कोरोना लस

30 July :- जगभरात कोरोना विषाणूचे थैमान सुरु आहे.कोरोना विषाणूने फक माणसांचे स्वस्थच खराब नाही केलं तर जगभरातील आर्थिक व्यवस्थेचं कंबरडं कोरोनाने मोडले आहे.जगभरात सर्वत्र एकच प्रश्न आणि प्रतीक्षा आहे.ती म्हणजे कोरोनावर मात करण्याकरिता प्रभावी लस कधी तयार होणार?या प्रश्नाचं आणि प्रतीक्षेत उत्तर अवघ्या जगाला दिले आहे. कोरोनावर मात करणारी प्रभावी लस ऑगस्टमध्येच बाजारात उपलब्ध होईल, असा दावा रशियाने केला आहे.

जगभरात कोरोनावर मात करण्याकरिता प्रभावी लस तयार करण्याचे काम युद्ध पातळीवर सुरु आहे.जगभरात सध्या शेकडो कोरोना लशी तयार करण्यात आल्या आहेत. त्यापैकी काही लशींची प्राण्यांवरील चाचणी यशस्वी ठरली आहे. तर काही लशी ह्युमन ट्रायलच्या टप्प्यात आहेत.ह्युमन ट्रायलच्या टप्प्यात असलेल्या लशींपैकी एक लस रशियाचीदेखील आहे.दोन आठवड्यांपेक्षाही कमी कालावधीत रशिया आपल्या कोरोना लशीला परवानगी देऊ शकतं, असं वृत्त सीएनएनने दिलं आहे.

मॉस्कोतील गमलेया इन्स्टिट्युटने ही कोरोना लस विकसित केली आहे. रशियाच्या अधिकाऱ्यांनी सीएनएनलाला दिलेल्या माहितीनुसार 10 ऑगस्टपर्यंत रशिया कोरोना लशीला परवानगी देऊ शकतो.रशियाने ही लस विकसित केली असली तरी त्याच्या चाचणीचा कोणताही वैद्यकीय अहवाल रशियाने प्रसिद्ध केलेला नाही. त्यामुळे ही लस किती सुरक्षित आणि परिणामकारक असेल हे सांगू शकत नाही, असं तज्ज्ञांनी सांगितलं आहे.