राजकारण

अयोध्येत बांधणार भव्य बौद्धविहार!

30 July :- देशाच्या राजकारणात अयोध्येतील राम मंदिरावरून गेली अनेक वर्ष रंगलेला वाद संपून येत्या काही दिवसात राम मंदिर उभारण्यात येणार आहे.राम मंदिराच्या भूमी पूजनाकरिता देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी जाणार असल्याची माहिती सुद्धा समोर आली आहे.दरम्यान केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी अयोध्येमध्ये तीस एक्कर जमिनीवरती भव्य विहार बांधण्याकरिता प्रयत्नशील असल्याचे म्हटले आहे.

रामदास आठवले म्हणाले,राम मंदिराच्या आधीदेखील बौद्ध विहार होतं. त्याचे अवशेष देखील मिळाले आहेत. त्यामुळे भव्य बौद्ध विहार करण्याचा आमचा मानस आहे.अयोध्येत राम मंदीर होतंय. बौद्ध विहार देखील व्हायला हवं. यासाठी मी स्वतः लवकरच मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेट घेणार आहे. तसेच त्याठिकाणी एका ट्रस्टची स्थापना करून तीस एकर जागा खरेदी करणार आहे. आणि त्या ठिकाणी बौद्ध विहार बांधणार आहे. येत्या काळात अयोध्येत राम मंदिरासोबतच़ बौद्ध विहार देखील अयोध्येत येणाऱ्या भाविकांना पाहिला मिळणार आहे.

गायक आनंद शिंदेनी या प्रश्नावर सर्व नेत्यांनी एकत्र यावं असं आवाहन केलं आहे अशी माहिती मला मिळाली आहे. आनंद शिंदे यांनी यामध्ये राजकारण आणण्याची गरज नाही.सध्याची परिस्थिती पाहता सगळे नेते एकत्र येणार नाहीत. शिवाय मी देखील त्यांच्यासोबत जाणारं नाही. बौद्ध विहार बांधण्यासाठी माझे प्रयत्न मी सुरु ठेवणार आहे.बाळासाहेब ठाकरे यांनी राम मंदिर व्हावं यासाठी खुप मेहनत घेतली आहे. 5 ऑगस्टच्या कार्यक्रमासाठी देशातील अनेक मुख्यमंत्र्याना निमंत्रण देण्यात येणार आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी देखील राम मंदिराच्या उद्घाटनासाठी जावं. त्यांना देखील लवकरच नक्कीच आमंत्रण येईल.