अभिनेत्री मयुरी देशमुखच्या पतीने घेतला गळफास!
एकीकडे कोरोनाचा कहर आणि दुसरीकडे विक्षिप्त होत चाललेली माणसाची मनोवृत्ती दिवसेंदिवस चिंताजनक होत चालली आहे.सध्य परिस्थितीमध्ये समाजात अतिशय संतापजनक घटना घडत असल्याने नागरिकांमध्ये खळबळ उडत आहे.मोठ्या सेलिब्रेटींसह सर्वसामान्य माणसं सुद्धा नैराश्यास वैतागून जीवनयात्रा संपवत आहेत.
खुलता कळी खुलेना’ या मालिकेतून घराघरात पोहचलेली अभिनेत्री मयुरी देशमुखचा पती आशुतोष भाकरे याने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. आशुतोषने नांदेडमधील राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. दरम्यान, आत्महत्येमागचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.
डॉ. प्रकाश बाबा आमटे, 31 दिवस आणि ग्रे सारख्या चित्रपटात मयुरीने काम केले आहे. परंती, तिला खरी ओळख खुलता कळी खुलेना या मालिकेतून मिळाली.