बीड

गेवराई ‘8’ दिवस लॉक!

29 July :- गेवराई शहरात कालपर्यंत कोरोनाचे 44 रुग्ण आढळून आले असून त्यांच्या सर्व सहवासीतांचा शोध लागत नसल्याने शहरातील कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी म्हणून गेवराई शहर 6 ऑगस्टपर्यंत लॉकडाऊन करण्याचा निर्णय जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आहे. या काळात अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व सेवा बंद राहतील. तसेच गेवराई शहरातून कोणालाही बाहेर जाता येणार नाही किंवा कोणाला शहरात येता येणार नसल्याचे जिल्हाधिकारी राहूल रेखावार यांनी सांगितले आहे.घाबरू नका…काळजी घ्या!