बीड

बीड जिल्ह्यात कोरोनाचे नवे ’58’ शिकार! ७ महिन्याच्या बाळालाही कोरोना

29 जुलै :- रोज रात्री येणाऱ्या धक्कादायक रिपोर्टने बीड प्रशासन,नागरिक चिंतेत पडले आहेत.दिवसेंदिवस झपाट्याने वाढत जाणाऱ्या कोरोनाबाधित रुग्णांच्या आकडेवारीमुळे बीड जिल्ह्याची परिस्थिती हाताबाहेर जाऊ लागली आहे.बीड जिल्ह्यातील कोरोनाबाधितांच्या मृत्यूचे वाढते प्रमाण जिल्ह्यामध्ये भीतीचे वातावरण निर्माण करत आहे.कोरोनाच्या वाढत्या संक्रमणांमुळे मुक्त संचार करणे कठीण झाले आहे.नागरिकांच्या हाताला काम नसल्यामुळे सर्व सामन्यांना रोज आर्थिक अडचणींना तोंड द्यावे लागत आहेत.

अशा भयाण परिस्थितीमध्ये आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार आज बीड जिल्ह्यात एकूण 58 पॉझिटीव्ह रुग्ण आढळले आहेत. बीडमध्ये धनराज कॉलनीमध्ये एका सात महिन्याच्या बाळालाही कोरोनाची लागन झाली आहे.
काळजी घ्या…गर्दी टाळा…मास्क वापरा…सोशल डिस्टन्स ठेवा…प्रशासनाच्या सुचनेचं पालन करा!