महाराष्ट्र

राज्यात रुग्ण बरे होण्याचा वेग कायम!

29 July :- राज्यात रुग्ण बरे होण्याचा वेग दिवसेंदिवस वाढतो आहे.कोरोनाबाधित रुग्ण संख्या वाढत असली तरी राज्यात रुग्ण बरे होण्याची संख्या देखील वाढत चालली आहे.कोरोनाबाधित रुग्णांच्या वाढत्या आकडेवारीमुळे राज्यभरात नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालेले आहे.मात्र गेल्या चार-पाच दिवसांपासून रुग्ण बरे होण्याच्या संख्येत झालेली वाढ प्रशासनाला आणि नागरिकांना दिलासा देणारी आहे.आज राज्यात एकूण 7478 रुग्णांना घरी सोडण्यात आले.यावरून कोरोना सुद्धा बरा होतो आहे हे लक्षात येते.यामुळे कोरोनाला घाबरून जायचे कुठलेच कारण नाही.

गेल्या 24 तासांमध्ये 9211 रुग्णांची वाढ झाली आहे. आज कोरोना रुग्णांच्या संख्येने 4 लाखांचा टप्पा ओलांडला. तर 298 रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे कोरोना रुग्णांची एकूण संख्या ही 4 लाख 651 एवढी झाली आहे. तर राज्याचा रिकव्हरी रेट 59.84 एवढा झाला आहे.


सर्व देशात मुंबई कोरोनाचा हॉट स्पॉट ठरला होता. महापालिका, राज्य सरकार यांनी केलेल्या प्रयत्नांचे आता परिणाम दिसत आहेत. काहीसा दिलासा देणारी आकडेवारी समोर आली असून या सकारात्मक परिणामांमुळे कोरोना विरुद्ध लढणाऱ्या सगळ्यांचाच उत्साह वाढणार आहे.
घाबरू नका…काळजी घ्या…गर्दी टाळा…मास्क वापरा…प्रशासनाच्या सूचनेचं पालन करा!