पंतप्रधान मोदींनी केलं अनोख्या पद्धतीने राफेलचं स्वागत!
29 July :- आज पहिल्या टप्प्यातील राफेल लढाऊ विमानांनी भारतात सुरक्षित लँडिंग केलं. याचा व्हिडीओ शेअर करीत भारत देशाचे कर्तव्यदक्ष पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनोख्या पद्धतीने राफेलचं स्वागत केलं.मोदींनी संस्कृतमध्ये एक श्लोक ट्विट केला आहे – राष्ट्ररक्षासमं पुण्यं, राष्ट्ररक्षासमं व्रतम्, राष्ट्ररक्षासमं यज्ञो, दृष्टो नैव च नैव च।। नभः स्पृशं दीप्तम्.. स्वागतम्! राफेल विमानाची पहिली तुकडी सकाळी अंबाला एअरबेसवर दाखल झाली.
याच पार्श्वभूमीवर अंबाला एअरबेसजवळील तीन किमी अंतरावर कडेकोट सुरक्षा तैनात करण्यात आली होती तसंच ड्रोन उडवण्यास बंदी घालण्यात आली होती.राफेल विमानांना पक्ष्यांची उपमा देत लॅण्डिंगविषयी माहिती देताना राजनाथ सिंह यांनी लिहिलं आहे की, “पक्ष्यांनी अंबालामध्ये सुरक्षित लॅण्डिंग केलं आहे. राफेल विमानं भारतात दाखल होणं ही भारतीय सामर्थ्याच्या नव्या युगाची सुरुवात आहे. या विमानांनी भारतीय वायुदलाचं सामर्थ्य वाढलं आहे.”जु फ्रान्सकडून खरेदी केलेले राफेलचे लढाऊ विमानं हरियाणातील अंबाला एअरबेसवर उतरले आहेत.
वायूसेनाचे प्रमुख एअर चीफ मार्शन आरकेएस भदौरिया यांनी अंबालामध्ये विमानांचं स्वागत केलं. सप्टेंबर 2016 रोजीमध्ये फ्रान्सबरोबर झालेल्या करारात भारताने सुमारे 58 हजार कोटींमध्ये 36 राफेल लढाऊ विमान खरेदी करण्याच्या करारावर स्वाक्षरी कऱण्यात आली. त्यापैकी 30 लढाऊ विमानं तर 6 प्रशिक्षण देणारी विमानं आहेत. राफेलची पहिल्या 5 विमानांची तुकडी बुधवारी भारताच्या ताफ्यात दाखल होत आहे. फेब्रुवारी 2021 पर्यंत भारताला राफेलची 36 विमानं भारतीय हवाई दलाच्या ताफ्यात दाखल होतील.आज भारतीय वायूसेनेसाठी ऐतिहासिक दिवस आहे.