राजकारण

शरद पवारांनी दिला राहुल गांधींना महत्वपूर्ण सल्ला

29 July :- राजकारणातील जाणत व्यक्तिमहत्व म्हणून शरद पवारांकडे पहिल्या जातं. राजकारणाच्या अनुभवाच्या जोरावर महाराष्ट्रच नव्हे तर देशाच्या राजकारणात देखील अनेक परिवर्तने झाली आहेत.वृत्त वाहिन्यांशी सवांद साधताना शरद पवारांनी काँग्रेसमधील त्यांचे अनुभव व्यक्त केले.शरद पवार म्हणाले मी अनेक वर्षांपासून काँग्रेसला बघत आलो आहे. आणि यातून एक गोष्ट मला दिसून येते. कोणी याचा स्वीकार करेल किंवा नाही..मात्र गांधीवाद काँग्रेससाठी मोठी ताकद आहे.पंतप्रधान मोदींवर टीका करणं थांबवायला हवं, ही वेळ काँग्रेसचं काम सांभाळायची आहे.

सोनिया गांधी काँग्रेसला एकत्र आणण्यात यशस्वी राहिल्या. आता काँग्रेसवर विश्वास असणाऱ्यांनी राहुल गांधी यांचा स्विकार केला आहे. मला वाटतं की सर्वांनी पक्षाची पूर्ण जबाबदारी राहुल गांधींवर सोपवायला हवी. ते पुढे म्हणाले राहुल गांधी यांनी पक्षाचं शासन सांभाळणं म्हणत्त्वपूर्ण आहेच आणि पक्षाच्या विविध नेत्यांशी चर्चा करणे गरजेचं आहे. ते म्हणाले – सर्व नेत्यांशी बोलायला हवं त्यांना एकत्र आणायला हवं..

शरद पवार म्हणाले, त्यांना देशाचा दौरा सुरू करायला हवा. त्यांनी प्रवास करावा.त्यानंतर पवारांना मोदींविरुद्ध गांधींच्या ट्विटविषयी विचारलं.राहुल गांधींनी ट्विट केलं होतं की पीएम आपली प्रतीमा तयार करण्यासाठी 100 टक्के लक्ष केंद्रीत करीत आहेत. भारतातील सर्व नियंत्रित संस्थानं या कामात व्यस्त आहेत. यावर शरद पवार यांनी राहुल गांधींना सल्ला दिला. ते म्हणाले हे त्यांचं वैयक्तिक मत असू शकतं. मात्र आपण पाहिलं आहे की जेव्हा तुम्ही कोणा एका व्यक्तीला वैयक्तिक लक्ष्य करता तेव्हा आपली विश्वासार्हता कमी होत जाते. हे टाळायला हवं