सिनेमा,मनोरंजन

धक्कादायक;’घरात भूत आहे’ असं सांगून रियाने सुशांतला वेडं बनवलं!

29 July :- हिंदी चित्रपट सृष्टीतील लोकप्रिय,आघाडीचा तरुण अभिनेता सुशांत सिंह राजपूत याने नैराश्यस वैतागून गळफास घेत जीवनयात्रा संपवली.सुशांतने आत्महत्या का केली या कारणाचा शोध पोलीस करत आहेत.मात्र एक महिन्यापेक्षा जास्त कालावधी लोटला आहे. अजूनही सुशांतच्या आत्महत्येचा कारणाचा उलघडा होऊ शकला नाही.हिंदी चित्रपट सृष्टीतील अनेक मोठ्या स्टार सेलिब्रेटींची चौकशी झाली आहे.पण सुशांत आत्महत्येचं कारण स्पष्ट झाले नाही.मात्र अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाला आथा वेगळं वळण मिळालं आहे. सुशांतचे वडील कृष्णा सिंह यांनी पाटणा पोलीस ठाण्यात FIR दाखल केली आहे. त्यामध्ये सुशांतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती आणि तिच्या कुटुंबावर आरोप केले आहेत. सुशांतला वेडं ठरवून त्याचे पैसे लुटायचा डाव रिया आणि तिच्या कुटुंबाचा होता असा आरोप सुशांतच्या वडिलांनी केला आहे.

सुशांतच्या वडिलांनी सांगितलं, “सुशांतला काही दिवसांतच भेटल्यानंतर रियाने त्याच्या आधीच्या घरात भूत असल्याचं सांगून त्याला घर बदलायला लावलं. त्यानंतर ज्या दुसऱ्या घरात सुशांत शिफ्ट झाला तिथं रिया आपल्या पूर्ण कुटुंबासह राहू लागली. रियाच्या कुटुंबाने त्याच्या घरातील नोकरही बदलले होते”

“रिया सुशांतचं मानसिक संतुलन खराब असल्याचं सांगू लागली. इतकंच नाही तर सुशांतला वेडं ठरवून त्याला मनोरुग्णालयात पाठवण्याची तयारीही रियाने केली होती. काही कारण नसताना डेंग्यू असल्याचं सांगून तिनं सुशांतला औषधं देणं सुरू केलं””सुशांतसह अभिनेत्री म्हणून काम करायला मिळेल याच अटींवर ती फिल्मच्या ऑफर्स स्वीकारायची. जेव्हा सुशांत केरळमध्ये आपला मित्र महेश शेट्टीसह शेतीचं काम सुरू करणार होता तेव्हादेखील रियाने त्याच्यावर दबाव ठेवला होता सुशांत डिसेंबरमध्ये आपल्या बहिणीला भेटायला गेला होता मात्र फोन करून करून रियाने त्याला जबरदस्ती मुंबईला बोलावलं. सुशांतला त्याच्या कुटुंबापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न रियाच्या कुटुंबाने केला.

रियाने सुशांतचा मोबाइल नंबरही बदलला होता जेणेकरून सुशांत आपल्या जुन्या मित्रमैत्रिणींपासून आणि आपल्या कुटुंबापासून दूर राहेल.””सुशांतच्या अकाऊंटमधून रिया आणि तिच्या कुटुंबाने कोट्यवधी रुपये गायब केलेत. सुशांतच्या आत्महत्येच्या काही दिवसांपूर्वीच रिया सुशांतचं क्रेडिट कार्ड आणि आवश्यक कागदपत्रं घेऊन घरातून निघून गेली आण सुशांतचा नंबरही ब्लॉक केला.रियाने सुशांतला धमकी दिली होती की लवकरच ती मीडियामध्ये सुशांतचा मेडिकल रिपोर्ट समोर आणेल जेणेकरून मीडिया सुशांतला वेडं समजेल आणि सुशांतला कुणी काम देणार नाही. यामुळेच सुशांत आत्महत्येपूर्वी खूप समस्येत होता. त्याने आपल्या बहिणीलाही बोलावलं होतं”