32 वर्षीय जवानाने आयुष्य संपवलं
29 July :- घरगुती विवाद कारणावरून तणावात आयुष्य जगणाऱ्या 32 वर्षीय सीआरपीएफ जवानाने छतावरुन उडी मारुन आत्महत्या केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. मृत जवानाचे नाव मुकेश असून ते मध्य प्रदेशचे होते. मात्र बदलीनिमित्त ते नवी दिल्लीत राहत होते.मंगळवारी दुपारी तणावात मुकेश यांनी हाताची नस कापली. त्यानंतर त्यांनी छतावरुन उडी मारली.
सीआरपीएफच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मुकेश रोहीणी जेलजवळ राहत होता. येथील एका इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरुन त्याने उडी मारली. पोलिसांच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मुकेश घरगुती विवादामुळे चिंतेत होता.
मुकेश याचं कुटुंबीय जबलपूरमध्ये राहत होतं, तर त्यांची पत्नी व मुले वाराणसीला तिच्या आई-वडिलांसोबत राहत होती. यामुळे ते तणावात असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. याबाबत मुकेशच्या पत्नीला कळविण्यात आले आले आहे..