सुखद;राज्यात रेकॉर्डब्रेक रुग्ण कोरोनामुक्त!
28 July :- राज्यात कोरोना विषाणूच्या हाहाकाराने प्रशासनासह नागरिकांमध्ये सुद्धा चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.दिवसेंदिवस वाढत्या कोरोनाबाधित रुग्णाच्या आकडेवारीमुळे राज्यावरील मोठ्या संकटाचे ढग स्पष्ट दिसू लागले आहेत.दरम्यान आज सलग दुसऱ्या दिवशी पुन्हा आलेल्या सुखद माहितीनुसार राज्यातील नागरिक आणि प्रशासनाला नक्कीच मोठा दिलासा मिळाला आहे.
राज्यात आज सलग दुसऱ्या दिवशी रुग्णवाढीची संख्या कमी आणि रुग्ण बरे होण्याची संख्या वाढली आहे.रुग्ण बरे होण्याची संख्या वाढलीच नाही तर राज्यात रुग्ण बरे होण्याची संख्या रेकॉर्डब्रेक झाली आहे. राज्यात आज 10 हजार 333 रुग्ण बरे होऊन घरी गेलेत. सलग दुसऱ्या दिवशी नवीन रुग्णांपेक्षा बरे झालेल्या रुग्णाची संख्या अधिक आहे.
आज राज्यात 7 हजार 700 नवे रुग्ण आढळून आलेत. नवीन रुग्णांच्या संख्येत घट होतांना दिसत असली तरी मृत्यूचा आकडा मात्र कमी होत नाही. आज राज्यात 282 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सोमवारीही बरे होणाऱ्या रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या ही जास्त होती. राज्यातल्या बरे होणाऱ्या रुग्णांचं प्रमाण 59.34 एवढं झालं आहे. राज्यातल्या एकूण रुग्णांची संख्या आता 3,91,440 एवढी झाली आहे.
घाबरू नका…काळजी घ्या…गर्दी टाळा…मास्क वापरा…प्रशासनाच्या सूचनेचं पालन करा!