FIR दाखल;सुशांतच्या प्रियसीने 17 कोटी लाटले!
28 July :- हिंदी चित्रपट सृष्टीतील लोकप्रिय,आघाडीचा तरुण अभिनेता सुशांत सिंह राजपूत याने नैराश्यस वैतागून गळफास घेत जीवनयात्रा संपवली.सुशांतने आत्महत्या का केली या कारणाचा शोध पोलीस करत आहेत.मात्र एक महिन्यापेक्षा जास्त कालावधी लोटला आहे. अजूनही सुशांतच्या आत्महत्येचा कारणाचा उलघडा होऊ शकला नाही.हिंदी चित्रपट सृष्टीतील अनेक मोठ्या स्टार सेलिब्रेटींची चौकशी झाली आहे.पण सुशांत आत्महत्येचं कारण स्पष्ट झाले नाही.
आताच मिळालेल्या माहितीनुसार सुशांतच्या वडिलांनी सुशांत आत्महत्या प्रकरणी पाटणा पोलीस ठाण्यात FIR दाखल केली आहे. त्यामध्ये सुशांतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती हिच्यावरही गंभीर आरोप करण्यात आले आहेत.बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या हस्तक्षेपानंतर ही एफआयआर दाखल करण्यात आली आहे. आता या प्रकरणी पाटणा पोलिसांनी देखील पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे. याप्रकरणी काही संभाव्य अटकेसाठी पाटण्याहून 4 पोलिसांची टीम मुंबईमध्ये दाखल झाली आहे.
रिया चक्रवर्तीने सुशांतच्या खात्यातून 17 कोटी रुपये काढले असल्याचा खळबळजनक आरोप करण्यात आला आहे.सुशांतच्या वडिलांनी दाखल केलेल्या तक्रारीत सुशांतला आत्महत्या करण्यास भाग पाडण्यात हिंदी चित्रपट सृष्टीतील काही लोकांचा हात असल्याचे स्पष्ट केले आहे.