कोरोना लशीची 30,000 लोकांवर चाचणी सुरू!
28 July :- डोळ्यांना न दिसणाऱ्या सूक्ष्म कोरोना नावाच्या विषाणूने संपूर्ण जगाला स्वतःच्या तालावाला नाचवले आहे.जगभरात कोरोनाचे सुरु असलेले थैमान काही केल्या शमल्या जात नाहीए.जगभरातील आरोग्य विभाग दिवरात्र धारपडतो आहे.मात्र कोरोनाचा खार नियंत्रणात येत नाही.कोरोना विषाणूंवर मात करण्यासाठी प्रभावी लस तयार करण्याचे काम जगभरात युद्धपातळीवर सुरु आहे.कोरोनाव्हायरसची लस कधी येणार याची प्रतीक्षा प्रत्येकाला आहे.
जगभरात शंभरपेक्षा अधिक कोरोना लशी बनत आहेत. त्यापैकी काही लशी या ह्युमन ट्रायलच्या टप्प्यात आहे. त्यापैकी एक लस ह्यमुन ट्रायलच्या शेवटच्या टप्प्यात पोहोचली आहे आणि 30 हजार जणांना ही लस दिली जाणार आहे.
अमेरिकेने तयार केलेली mRNA 1273 ही कोरोना लस. नॅशनल इन्स्टिट्युट ऑफ हेल्थ अँड मॉडर्ना इंक कंपनीने ही लस तयार केली आहे. मॉडर्नाच्या पहिल्या स्टेजच्या ट्रायलमध्ये 45 लोकांना ही लस देण्यात आली आहे. त्यावेळी या लोकांमध्ये रोगप्रतिकारक शक्तीमध्ये बचाव दिसून आला होता. ताप आणि वेदनासारखे सौम्य दुष्परिणामही दिसून आले.
आता ही लस 30,000 लोकांना दिली जाणार आहे. ज्या लोकांना ही लस दिली जाणार आहे, त्यांना खरी लस दिली जात आहे की डमी याबाबत माहिती देण्यात आलेली नाही. दोन डोस दिल्यानंतर त्याचा काय परिणाम होतो हे तपासलं जाणार आहे.