पोलिसांवर कंगना भडकली!
28 July :- हिंदी चित्रपट सृष्टीतील लोकप्रिय,आघाडीचा तरुण अभिनेता सुशांत सिंह राजपूत याने नैराश्यस वैतागून गळफास घेत जीवनयात्रा संपवली.सुशांतने आत्महत्या का केली या कर्णाचा शोध पोलीस करत आहेत.मात्र एक महिन्यापेक्षा जास्त कालावधी लोटला आहे मात्र अजूनही सुशांतच्या आत्महत्येचा कारणाचा उलघडा होऊ शकला नाही.हिंदी चित्रपट सृष्टीतील अनेक मोठ्या स्टार सेलिब्रेटींची चौकशी झाली आहे.पण सुशांत आत्महत्येचं कारण स्पष्ट झाले नाही.
अभिनेत्री कंगना रणौतलाही पोलिसांनी समन्स जारी केला आहे. मात्र यानंतर करण जोहरऐवजी त्याच्या मॅनेजरला समन्स पाठवल्याने कंगना भडकली आहे.सुशांत आत्महत्या प्रकरणाच्या तपासासाठी मुंबई पोलसांनी करण जोहरऐवजी त्याच्या मॅनेजरला चौकशीसाठी समन्स जारी केला आहे. यावरून कंगना संतप्त झाली आहे. सुशांतच्या हत्याकांडाची चेष्टा करणं बंद करा, असं तिनं मुंबई पोलिसींना म्हटलं आहे.
संतप्त झालेल्या कंगनाने ट्वीट केलं आहे.कंगनाच्या टीमने केलेल्या ट्वीममध्ये म्हटलं आहे, “करण जोहरच्या मॅनेजरला समन्स पाठवण्यात आला आहे. मात्र आदित्य ठाकरे यांचा बेस्ट फ्रेंड करण जोहरला नाही. मुंबई पोलिसांनी सुशांत सिंह राजपूतच्या हत्याकांडाच्या तपासाची चेष्टा करणं बंद करा”
“समन्स जारी करतानाही मुंबई पोलीस इतका निर्लज्जपणा कसा दाखवू शकतात? कंगनाला समन्स पाठवण्यात आला आहे तिच्या मॅनेजरला नाही. मात्र मुख्यमंत्र्यांचा मुलाचा सर्वात चांगल्या मित्राच्या मॅनेजरला चौकशीसाठी बोलवण्यात आलं आहे. का? साहेबांना त्रास होऊ नये म्हणून?”, असं या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.