महाराष्ट्र

निष्ठुरतेचा कळस!ओल्या बाळंतीणीस काढले हॉस्पिटलच्या बाहेर

28 July :- राज्यात सर्वत्र कोरोना विषाणूचा कहर सुरु आहे.राज्यात दिवसेंदिवस वाढणाऱ्या कोरोनाबाधित रुग्णांच्या आकडेवारीमुळे राज्यावरील मोठ्या संकटाचे ढग दिसू लागले आहेत.अशा भयाण परिस्थितीमध्ये माणसांनी माणुसकी सोडल्यास नक्कीच संताप होण्यासारखे आहे.अशीच एक माणुसकीला कलंक लावणारी घटना हिंगोली येथील रुग्णालयात घडली आहे.

सिझेरियन होऊन बाळंतीण झालेल्या एका महिलेला कोरोना झाल्याचा अहवाल प्राप्त होताच, तिला सरकारी रुग्णालय प्रशासनाने रुग्णालयातून बाहेर काढल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. या घटनेमुळे कोरोनाचा द्वेष करण्यापेक्षा आजारी लोकांचाच द्वेष करण्यात येत असल्याचे स्पष्ट तर झाले आहेच; शिवाय रुग्णालय प्रशासनाची बेपरवाई सुद्धा दिसून येत आहे.

दुसऱ्या एका बाळंतिणीने पाच दिवसापूर्वी सिझेरीयन करुन प्रसुत झालेल्या ओल्या बाळंतीणीस चक्क रुग्णालयातून बाहेर काढण्याचा संतापजनक प्रकार वसमत येथील शासकीय महिला रुग्णालयात आज सोमवारी दुपारी घडला. वसमत शहरातील पठान मोहल्ला भागातील महिला 22 जुलै रोजी प्रसुतीसाठी शासकीय रुग्णालयात दाखल झाली होती. सिझेरीयन करत प्रसुतीनंतर तिला कन्यारत्न प्राप्त झाले. कन्यारत्न झाल्याने कुटुंबीय आंनदात होते. मात्र अचानक आज सदर महिलेचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याचे वृत्त रुग्णालयात धडकले. यानंतर पाच दिवसाच्या ओल्या बाळंतिणीला चक्क एका टॅक्सी ऑटोमध्ये बसवून उपजिल्हा रुग्णालयात काढून दिले हा प्रकार पाहुन ओली बाळंतीन भांबावून गेली.

दरम्यान स्त्री रुग्णालय प्रसुत झालेल्या ओल्या बाळंतिणीला पाच दिवसाच्या चिमुकलीला ज्या पध्दतीची वागणुक दिली ती चुकीची असून स्त्री रुग्णालय प्रशासनाच्या निष्काळजीपणा समोर आला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढवून नागरिकांचे जीव धोक्यात आणल्याप्रकरणी संबधित डॉक्टर, जबाबदार कर्मचाऱ्यांविरूद्ध आपत्ती व्यवस्थापन कायद्याअंतर्गत कारवाई करण्याची मागणी मुस्लीम सेवा संघाचे जिल्हा अध्यक्ष नदीम सौदागर, एमआयएमचे युवक शहराध्यक्ष पठाण यांनी उपविभागीय अधिकारी, वसमत यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.