महाराष्ट्र बोर्डाचा इयत्ता दहावीचा निकाल उद्या
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इयत्ता दहावीचा निकाल बुधवारी २९ जुलै रोजी जाहीर करण्यात येणार आहे.
पुढील संकेतस्थळांवर पाहता येणार निकाल –
www.mahresult.nic.in
www.sscresult.mkcl.org
www.maharashtraeducation.com
या परीक्षेला राज्यभरातून १७ लाख ६५ हजार ८९८ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. गतवर्षीच्या तुलनेत यंदा विद्यार्थी संख्या ६५ हजार ८५ ने वाढली आहे. संपूर्ण राज्यात परीक्षेसाठी ४ हजार ९७९ परीक्षा केंद्रे होती. एकूण २२ हजार ५८६ माध्यमिक शाळांमधून विद्यार्थ्यांची नांेदणी झाली होती. राज्यात दि. ३ ते २३ मार्च या कालावधीत दहावीची लेखी परीक्षा पार पडली. पुनर्रचित अभ्यासक्रमानुसार होणाऱ्या परीक्षेसाठी १७ लाख ६५ हजार ८९८ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली. यामध्ये ९ लाख ७५ हजार ८९४ मुले व ७ लाख ८९ हजार ८९४ मुली आहेत. राज्यातील नऊ विभागीय मंडळामार्फत परीक्षा घेण्यात आली. एकूण ९ हजार ४५ दिव्यांग विद्यार्थी परीक्षेला बसले होते.