बीड

चिनी कंपन्यांकडे शेवटचे 8 तास…अन्यथा भारतात कायमची बंदी

नवी दिल्ली, 28 जुलै : चिनी टेक्नॉलॉजी कंपन्यांच्या अप्सबाबत भारत सरकारच्या नोटीसचं उत्तर देण्याचा आज शेवटचा दिवस आहे. जर कंपन्यांनी आज सायंकाळपर्यंत उत्तर दिलं नाही तर या अॅप्सवर कायमची बंदी घालण्यात येईल. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार तब्बल 50 कंपन्यांनी सरकारच्या नोटीसला उत्तर दिलं आहे. सध्या सरकारकडून यांच्या उत्तराची समीक्षा करण्यासाठी एका समितीचं गठण करण्यात आलं आहे.

सरकारने 8 जुलै रोजी 59 चायनीज कंपन्यांना नोटीस पाठवली होती. याबाबत कंपन्यांकडून 3 आठवठ्यांत उत्तर मागितलं होतं. सरकारने कंपन्यांना 70 हून अधिक प्रश्न विचारले होते. ज्याचं उत्तर देण्यासाठी 28 जुलै ही शेवटची तारीख आहे. सरकारने कंपन्यांना सर्वर डेटा शेअरिंग पॉलिसीवर प्रश्न विचारले होते. शिवाय कंपन्यांचा डेटा प्रोसेसिंग आणि स्टोरेज कसं केले जाते यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं.

MeiTY यांनी सायबर लॉ विभागचे ग्रुप कॉर्डिनेटर यांच्या अध्यक्षतेखाली समितीचे गठण केलं. ही समिती एक ते दोन आठवड्यांच्या आत या कंपन्यांच्या उत्तराची समीक्षा करेल. जर या चिनी कंपन्यांनी चीनव्यतिरिक्त अन्य ठिकाणी सर्वर स्थापित करत असेल तर त्यांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे. जर सरकार त्यांच्या उत्तरामुळे समाधानी नसले तर त्या अप्सवर कायमची बंदी लागण्याची शक्यता आहे. सोमवारी केंद्र सरकारने 49 चिनी अप्सवर बंदी आणली. गेल्या महिन्यात केंद्र सरकारने टिकटॉक, हेलोसह एकूण 59 अ‍ॅप्स बॅन केले होते. यानंतर भारताने आणखी 47 अ‍ॅप्स बंद केले आहे. या 47 अ‍ॅप्सची यादी लवकरच जारी करण्यात येणार आहे