बीड-कोरोनाने घेतला आणखी दोघांचा बळी!
27 July :- बीड जिल्ह्यात पुन्हा 2 कोरोना बाधीत रुग्णांचा मृत्यू झाला आहे.दोन्ही रुग्ण माजलगाव तालुक्यातील आहेत.यातील एका रुग्णाचा रविवारी मृत्यू झाला आहे.मात्र याचा रिपोर्ट सोमवारी दि.२७ रोजी पहाटे आला होता. दुसऱ्या महिला वृद्ध रुग्णाचा सोमवारी दुपारी अंबेजोगाई येथे मृत्यू झाला.
रविवारी सकाळी माझलगाव तालुक्यातील खतगव्हाण येथील 70 वर्षीय वृद्धाचा अंबाजोगाई येथे मृत्यू झाला.सोमवारी पहाटे जे 34 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत त्यात संबंधित वृद्ध रुग्णाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.
दरम्यान याच दिवशी पहाटे कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या नवीन वसाहत, भाटवडगाव (ता.माजलगाव) येथील 80 वर्षीय महिला रुग्णाचा उपचार घेताना दुपारी 4.30 वाजेच्या सुमारास अंबाजोगाई येथील स्वाराती रुग्णालयात मृत्यू झाला मुळे कोरोनाने मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या आता 26 झाली
आहे.
घाबरू नका…काळजी घ्या…गर्दी टाळा…मास्क वापरा…प्रशासनाच्या सूचनेचं पालन करा!