हॉस्पिटलचा निष्काळजीपणा;कोरोना रुग्णाने तडफडत सोडले प्राण!
27 July :- जगव्यापी कोरोना विषाणूच्या हाहाकाराने अनेक माणसांचा बळी घेतला आहे.नागरिकांना कोरोनाच्या चपेटीतुन सोडविण्याकरिता देशातील आरोग्य विभाग स्वतःच्या प्राणांची तमा न बाळगता आहोतरत्र मेहनत घेत आहे.आशा परिस्थितीमध्ये कोरोना रुग्णाकडे दुर्लक्ष झाल्याचा भयानक प्रकार समोर आला आहे. शासकीय रुग्णालयात दाखल झालेला रुग्ण पलंगावरून पडल्यामुळे मृत्यू झाला आहे. रविवारी जिल्हा रुग्णालयात झालेल्या या घटनेत 70 वर्षाच्या कोरोना रूग्णाचा मृत्यू झाला आहे.
22 जुलै रोजी कोरोना रुग्णाला दाखल करण्यात आलं होतं.मिळालेल्या माहितीनुसार, तेलंगणाच्या करीमनगरमध्ये हा गंभीर प्रकार घडला आहे. रुग्णाला श्वास घेण्यासाठी त्रास होत असल्यामुळे त्यांना रुग्णालयात ऑक्सिजनवर ठेवण्यात आलं होतं. रविवार रुग्णावर कोणाचं लक्ष नव्हत आणि अशात त्यांचा तोल गेला आणि ते बेडवरून खाली पडले त्यामुळे त्यांचा ऑक्सिजन सप्लाय बंद झाला. बराचवेळ ऑक्सिजन न मिळाल्यामुळे रुग्णाचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.
संबंधित वॉर्डमध्ये असलेल्या रुग्णांनी आरोप केला आहे की, 70 वर्षीय वृद्ध व्यक्ती पलंगावरून खाली पडल्याची माहिती तात्काळ रुग्णालय व्यवस्थापनाला सांगण्यात आली होती. परंतु कोणीही वेळीच न आल्यामुळे रुग्णाचा मृत्यू झाला. श्वास घेण्यात अडचण आल्यामुळे रुग्णाला त्रास होत होता, पण रुग्णालयाकडून कुणीही मदतीसाठी पुढे आले नाही. अखेर रुग्णाचा मृत्यू झाला.या दरम्यान, इतर रुग्णांनी केलेल्या तक्रारीचा एक व्हिडिओदेखील समोर आला आहे. ज्यामध्ये रुग्णालय प्रशासनाचं दुर्लक्ष स्पष्टपणे दिसून आलं आहे. रुग्णालय प्रशासनानं हा अपघातात आपली चुकी असल्याचं मान्य केलं असून संबंधित कर्मचाऱ्यांवर कारवाई करणार असल्याचं सांगण्यात आलं आहे.