महाराष्ट्र

चिमुकलीवर बलात्कार करून केली निर्घृण हत्या

27 July :- राज्यावर सध्या कोरोना विषाणूचे मोठं संकट आहे.प्रत्येकजण कोरोना विषाणूच्या संकटामधून सावरण्याचा प्रयत्न करत आहे.आशा भयाण परिस्थितीमध्ये रायगड येथील तांबडा तालुक्यात संतापजनक घडली आहे. तांबडा तालुक्यात एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली आहे. या घटनेमध्ये संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. तर नागरिकांमध्येही संतापाचं वातावरण आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, 26 जुलै रात्री ही धक्कादायक घटना उघडकीस आली. पोलिसांनी अज्ञात आरोपीविरोधात रोहा पोलीस स्थानका गुन्हा दाखल केला आहे. तर असा निर्दयी प्रकार कोणी केला याचा पोलीस सध्या शोध घेत आहेत. पोलिसांनी मुलीचा मृतदेह ताब्यात घेतला असून तो शवविच्छेदनासाठी नजिकच्या स्थानिक रुग्णालयात पाठवला आहे.दरम्यान, या घटनेमुळे रोहा तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे.

या गंभीर घटनेची विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी दखल घेतली असून उद्या मंगळवार 28 जुलै रोजी ते रोहाच्या दौ-यावर येत आहेत.प्राथमिक माहितीनुसार, रविवारी संध्याकाळपासून ही अल्पवयीन मुलगी बेपत्ता होती. त्यामुळे कुटुंबीयांकडून तिचा शोध सुरु होता. अखेर रात्री उशीरा गावाबाहेर या मुलीचा मृतदेह सापडला.