सुशांतच्या आत्महत्येची पंतप्रधान मोदींनी घेतली दखल
27 जुलै :- हिंदी चित्रपट सृष्टीतील लोकप्रिय,आघाडीचा तरुण अभिनेता सुशांत सिंह राजपूत याने नैराश्यस वैतागून गळफास घेत जीवनयात्रा संपवली.सुशांतने आत्महत्या का केली या कर्णाचा शोध पोलीस करत आहेत.मात्र एक महिन्यापेक्षा जास्त कालावधी लोटला आहे मात्र अजूनही सुशांतच्या आत्महत्येचा कारणाचा उलघडा होऊ शकला नाही.हिंदी चित्रपट सृष्टीतील अनेक मोठ्या स्टार सेलिब्रेटींची चौकशी झाली आहे.पण सुशांत आत्महत्येचं कारण स्पष्ट झाले नाही.
सुशांतच्या आत्महत्येची CBI चौकशी करण्याची मागणी जोर धरत आहे.दरम्यान भाजप खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी याप्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहिलं होतं. त्याची दखल पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतली आहे. पंतप्रधान कार्यालयाने हे पत्र स्वीकारलं आहे.सुशांतच्या आत्महत्येप्रकरणी आवश्यक तथ्य आणि पुरावे जमा करण्याची जबाबदारी सुब्रमण्यम स्वामी यांनी अधिवक्ता इशकरण सिंह भंडारीला सोपवलं होतं. इशकरण यांनी ट्वीट करून पंतप्रधान कार्यालयाने हे पत्र स्वीकारलं आहे, अशी माहिती दिली आहे. इशकरण यांनी हे पत्रदेखील आपल्या ट्वीटसह जोडलं आहे.