महाराष्ट्र

लग्नानंतर प्रियकरासोबत नववधू झाली सैराट!

27 जुलै :- लग्नानंतर अवध्या 15 दिवसांतच सासरी आलेल्या नववधूनं प्रियकरासोबत धूम ठोकल्याची घटना समोर आली आहे. अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा येथे ही घटना घडली आहे.श्रीगोंदा तालुक्यातील बाबुर्डी येथे राहणाऱ्या एका तरुणाशी बारामती तालुक्यातील तरुणीचा 25 जूनला विवाह झाला होता. दरम्यान, नववधूनं चक्क प्रियकरासोबत धूम ठोकली.

या प्रकरणी पतीने दिलेल्या तक्रारीवरुन पत्नी आणि तिच्या प्रियकराविरोधात श्रीगोंदा पोलीस ठाण्यामध्ये फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबंधित तरुणी प्रियकरासोबत आळंदीला पळाली असून तिथे जाऊन त्या दोघांनी लग्न केल्याची माहिती समोर आली आहे. लग्नापूर्वीच तरुणीचे तरडोली गावातील तरुणासोबत प्रेमसंबंध होते. तरुणी सुमारे दीड लाख रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने घेऊन पसार झाली आहे.