महाराष्ट्र

राज्यात नव्या रुग्णांची संख्या उच्चांकी;6044 रुग्णांना मिळाला डिस्चार्ज!

26 July :- राज्यात सर्वत्र कोरोना विष्णूचा कहर सुरूच आहे.कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे राज्यात अनेक ठिकाणी संचारबंदी करण्यात आली आहे.मात्र कोरोना विषाणूचे संक्रमण काही केल्या आटोक्यात येत नाहीए.प्रशासनाला आणि नागरिकांना दिलासा देणारी एकमेव गोष्ट आहे ती म्हणजे राज्यात रुग्ण बरे होणायचा वेग दिवसेंदिवस वाढत आहे.मात्र नव्या रुग्णचिओ वाढणारी भरमसाठ संख्या डोकेदुखी होत आहे.

राज्यात आज 9 हजार 431 नवीन रुग्ण आढळले आहेत.तर 6044 रुग्ण डिस्चार्ज मिळाला आहे. आज 267 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्यातल्या एकूण रुग्णांची संख्या 375799 वर गेली आहे. मृत्यूचा आकडा 13656 एवढा झाला आहे. मुंबईत आज 1101 रुग्ण आढळले. त्यामुळे मुंबईतल्या रुग्णांची संख्या 109161 झाली आहे.

राज्याचा सध्या मृत्युदर 3.63 टक्के एवढा आहे. राज्यात बरे होण्याचे प्रमाण 56. 74 टक्के एवढे झाले आहे. तर ठाणे महानगरपालिका क्षेत्रात आज 286 नवीन कोरोना रुग्ण आढळले. त्यामुळे रुग्णांची एकूण संख्या 17738 एवढी झाली.
काळजी घ्या…गर्दी टाळा…मास्क वापरा…सोशल डिस्टन्स ठेवा…प्रशासनाच्या सुचनेचं पालन करा!