बीड

ठाकरे सरकारमधील मंत्री कोरोनाच्या विळख्यात

26 July :- कोरोना विषाणूचा कहर सर्वत्र सुरु आहे. सामान्य नागरिकांसह सेलिब्रेटी,खेळाडू,राजकीय नेते,प्रशासकीय अधिकारी कोरोनाच्या विळख्यात अडकत आहेत.आताच मिळालेल्या माहितीनुसार ठाकरे सरकारमधील उदगीरचे मतदासंघाचे आमदार आणि राज्याचे पाणीपुरवठा राज्यमंत्री संजय बनसोडे यांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे.

संजय बनसोडे यांनी गेल्या काही दिवसांपासून तब्येत ठीक नव्हती. मागील काही दिवसांपासून ताप आणि अंगदुखीने ते आजारी होते. त्यानंतर त्यांची कोविड 19 टेस्ट करण्यात आली त्यात त्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे.मुंबईतील एका खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. लातूर जिल्ह्यातील उदगीर तालुक्यात काही दिवसांपूर्वी सर्वाधिक रुग्ण होते. त्यावेळी ते सतत मतदारसंघात ठान माडून बसले होते. रुग्णालयात जात कोरोना रुग्णांना ते धीर देत होते. या सततच्या जणसंपर्कमुळे त्यांना कोरोनाची लागण झाली असावी.