बीड

वाढदिवस पंकजाताईंचा;कार्यकर्त्याने ठेवले मुलीचे नाव ‘पंकजा’

26 July :- भाजपच्या दिग्गज नेत्या आणि माजी मंत्री पंकजा मुंडे यांचा आज वाढदिवस आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव लक्षात घेता पंकजा ताईनी सर्व कार्यकर्त्यांना आवाहन केलेले होते कोणीही माझ्या वाढदिवसासाठी मला भेटण्याचा प्रयत्न करून,स्वतःचा जीव धोक्यात घालू नका स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्या. ताईंच्या वाढदिवसा रोजीच एका कार्यकर्त्याला कन्यारत्न झालं.या कार्यकर्त्यांने त्या चिमुकलीचं नाव ठेवलं ‘पंकजा’ ठेवले आहे.

पंकजा ताईंना हि गोष्ट समजताच ताईंनी छोट्या पंकजाला भरभरून आशीर्वाद दिले आहेत.केरबा पाटील हे पंकजा मुंडे यांचे कार्यकर्ते आहे. सरपंच असलेले केरबा पाटील यांना आज कन्यारत्न झालं. आपल्या नेत्या असलेल्या पंकजा मुंडे यांच्या वाढदिवशी कन्यारत्न झाल्याने त्यांचा आनंद द्विगुणीत झाला. त्यांनी आपल्या मुलीचं नाव ‘पंकजा’ असं ठेवलं. केरबा पाटील यांनी या चिमुकलीचा फोटो ट्विट करत पंकजाताईंना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.पंकजा ताई यांनीही आपल्या कार्यकर्त्याच्या आनंदात सहभागी होत तिला आशीर्वादही दिलेत. शुभेच्छांसाठी धन्यवाद आणि छोट्या पंकजाला आशीर्वाद असं पंकजा मुंडे यांनी ट्विट केलं आहे. कोरोना आणि लॉकडाऊनमुळे पंकजा मुंडेंनी घरीच आपला वाढदिवस साजरा केला.