क्राईम

विटा विकायला गेला आणि 15 लाखाला फसला!

बीड- बीड जिल्हा नेहमीच विचित्र घटनांनी चर्चेमध्ये असतो.अशीच एक विचित्र घटना घडली आहे.महिलेसोबत शारीरिक संबंधांचे अश्लील छायाचित्रीकरण व फोटो तयार करून ते सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत १५ लाख रुपयांची मागणी केल्याची घटना शुक्रवारी व शनिवार तारीख २५ च्या दरम्यान आष्टी येथे घडली. याप्रकरणी नितीन रघुनाथ बारगजे यांच्या फिर्यादीवरून ७ आरोपी विरुद्ध नेकनुर पो.स्टे.ला गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

याबाबत पोलिस सूत्रांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की नितीन रघुनाथ बारगजे यांची केज येथे वीटभट्टी असून त्यांचे सुरेखा शिंदे यांच्याशी फोनवर बोलणे झाले. त्याच दरम्यान सुरेखा शिंदे यांनी विटा पाहिजे आहेत तुम्ही मांजरसुंबा येथे या असे सांगितले. त्यानंतर शुक्रवारी सकाळी अकराच्या दरम्यान नितीन हा मांजरसुंबा येथे गेला. सुरेखा शिंदे व त्याचे बोलणे झाले त्यानंतर सुरेखा शिंदे यांनी नितीन ला मला गाडी नाही तुम्ही पाटोदा पर्यंत नेऊन सोडा असे सांगितले व तेथे गेल्यानंतर पुढे आष्टी येथे सोडा असे सांगितले.

आष्टी येथे गेल्यानंतर सुरेखा शिंदे यांनी नितीन ला चहा घेण्यासाठी घरी येण्यास सांगितले व घरात गेल्यानंतर अशील छायाचित्रीकरण व फोटो काढून नितीन ला ते सोशल मीडियावर व्हायरल करू अशी धमकी दिली. ते करायचे नसतील तर १५ लाख रुपये द्या असे सांगण्यात आले. या दरम्यान तडजोड झाल्यानंतर दहा लाख देण्याचे ठरले त्यासाठी केज येथे येण्याचे नियोजन झाले.

केजला जाण्यासाठी नितीन बारगजे सोबत त्याच्या रोजी केज येथे आल्यानंतर नितीन बारगजे याने आपल्या मित्राच्या सहाय्याने शेखर वेदपाठक ला पकडले. याचदरम्यान पाठीमागे असलेली स्कार्पिओ निघून गेली. यातील काही घटना मांजरसुंबा येथे घडलेली असल्यामुळे नितीन रघुनाथ बारगजे यांनी शनिवारी नेकनूर पोलीस स्टेशन गाठून याबाबत रितसर फिर्याद दाखल केली आहे यामध्ये कैलास गुजर, प्रशांत श्रीखंडे, योगेश मुटकुळे, वैभव पोकळे, शेखर वेदपाठक, सुरेखा शिंदे, सविता वैद्य यांच्याविरुद्ध गुन्हा रजिस्टर क्रमांक १५६/२० कलम ३८४, ३२४ ,३२३ ,१२०(ब)भा.द.वि. नुसार गुन्हा नोंद करण्यात आला असून तपास गुन्हे अन्वेषण शाखेचे भारत राऊत हे करत आहेत.