खळबळजनक; कोरोना रुग्ण गेला पळून!
26 July :- कोरोनाबाधित रुग्णांच्या वाढत्या आकडेमुळे प्रशासन आणि नागरिक चिंतेत आहे.आशा परिस्थितीमध्ये मुंबई शहरात खळबळजनक घटना घडली आहे.मुंबई येथिल विरारमधील विजय वल्लभ रुग्णालयातून कोरोनावर उपचार घेत असलेला रुग्ण दीड लाखांचं बिल ऐकून पळून गेल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
विरार पश्चिमेकडील विजय वल्लभ रुग्णालयात 12 जुलै रोजी कोरोनावर उपचार घेण्यासाठी विरार परिसरात राहणाऱ्या एका रुग्णाला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. पाच-सहा दिवस उपचार घेतल्यानंतर रुग्णाची प्रकृती सुधारली होती. या उपचाराचं बिल दीड लाखाच्या आसपास असल्याचं रुग्णाला समजताच या रुग्णाने हॉस्पिटलच्या एचआरसोबत बोलण्याचा बहाणा करून रुग्णालयातून पळ काढला.
डॉक्टरांनी फोन केल्यावर मी सर्वाना बाधित करण्याची धमकी देण्यात आली आहे. रुग्णालयं अव्वाच्या सव्वा बिले आकारत असल्याने हा प्रकार घडला असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार, पोलीस या रुग्णाचा शोध घेत असल्याची माहिती देण्यात आली आहे. तर या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे.