क्रीडा

सौरव गांगुली केली कोरोना चाचणी!

26 July : – कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव दिवसेंदिवस चिंताजनक होत चालला आहे.गरीब-श्रीमंत,सेलिब्रेटी,खेळाडू,राजकीय नेते,अधिकारी एकंदरीत सर्वच कोरोना विषाणूच्या चपेटीत सापडत आहे.आताच हाती आलेल्या माहितीनुसार कोरोनाचे संकट माजी कर्णधार आणि बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीच्या घरापर्यंत देखील पोहोचले आहे.


सौरवचा मोठा भाऊ स्नेहाशिष गांगुली यांना कोरोनाची लागण झाली होती. भाऊ कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्यानंतर सौरव गांगुलीने देखील स्वत:ला होम क्वारंटाइन करून घेतले आहे.दरम्यान सौरव गांगुली सर्व कामकाज घरूनच पाहत आहे. BCCI च्या अधिकाऱ्यांशी त्याचे व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संभाषण सुरू असते.यानंतर लागलीच गांगुलीने देखील कोरोना टेस्ट करून घेतली आहे.

सौरव गांगुलीमध्ये कोरोनाची कोणतीही लक्षणे आढळून आली नव्हती. मात्र खबरदारी म्हणून त्याने ही टेस्ट करून घेतली आहे.दिलासादायक बाब अशी की सौरवची कोरोना टेस्ट नेगिटिव्ह आली आहे.