महाराष्ट्र

राज्यात रुग्ण बरे होण्याचं प्रमाण वाढलं;मात्र रुग्णवाढ उच्चांकी

25 July :- कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव राज्यात दिवसेंदिवस चिंतेचं वातावरण निर्माण करत आहे.कोरोना विषाणूच्या वाढत्या संक्रमणामुळे मुक्त संचार करणे कठीण होत असल्याने सर्व सामान्य माणसांच्या हाताला काम भेटणे कठीण झाले आहे.नागरिकांच्या हाताला काम नसल्याने नाकरिकांना मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे.आशा भयाण परिस्थितीमध्ये राज्याची आर्थिक उलाढाल कमी होऊ लागली आहे.

कोरोनामुळे राज्यात अनेक ठिकाणी लॉकडाऊन करण्यात आले आहे.राज्यातील नागरिकांना,प्रशासनाला दिलासा देणारी एकमेव गोष्ट म्हणजे राज्यात रुग्ण बरे होण्याचा वेग वाढत आहे.आज राज्यात 7 हजार 227 जणांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे.

मात्र गेल्या २४ तासांत 9251 रुग्णांची वाढ झाली आहे.तर आज 257 एवढ्या रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे रुग्णांची एकूण संख्या 366368 एवढी झाली आहे. तर 13389 जणांचा आत्तापर्यंत मृत्यू झाला आहे.