राजकारण

शरद पवारांनी केली विरोधकांची बोलती बंद!

25 July :- महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री उद्धव ठाकरें यांनी कोरोना काळात एकही दौरा केला ही. ते एका ठिकाणी बसूनच राज्यातील कामकाज पाहत आहेत. यावर विरोधकांकडून वारंवार कडाडून टीका होत आहे. विरोधकांच्या या टीकेचे सडेतोड उत्तर देत शरद पवारांनी विरोधकांची बोलती बंद केली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस सर्वेसर्वा शरद पवार औरंगाबाद शहरातील कोरोना स्थितीचा आढावा घेण्यासाठी आले होते.मुख्यमंत्री कुठेही जात नाही, असा सवाल विरोधक करत आहेत. यावर शरद पवार यांनी सांगितलं की, मुख्यमंत्री एकाच भागात जाऊन बसले तर, निर्णय प्रक्रियेत अडचणी निर्माण होतील. यामुळे कॅप्टनने मुख्य ठिकाणी बसून सर्वांवर लक्ष ठेवावे, जी कमतरता असेल ती सांगावी, असा आमचा आग्रह आहे. आता पालकमंत्री इथून गेले तर ते मुख्यमंत्री आणि त्यांच्या संबंधीत गोष्टींशी चर्चा करतील. ही कमतरता आहे ती पूर्ण करा, मी देखील मुख्यमंत्र्यांना भेटून कमतरतांविषयी सांगेल. यामुळे त्यांनी एका ठिकाणी बसून लक्ष ठेवणं गरजेचं असल्याचं शरद पवार म्हणाले.


राज्यातील परिस्थितीचा आढावा घेणे महत्त्वाचं आहं. यासाठी मी दौरे करतोय, मला करमत नाही, मला एका जागेवर बसवत नाही. मी सतत लोकांमध्ये फिरणारा माणूस आहे. मला लोकांशी बोलत राहण्याची सवय आहे. यामुळे मी फिरत असतो. जिथे संकट आलं तिथे मी जातो. चौकशी करणं, मदत करणं, या भावनेतून मी फिरतोय, असं शरद पवारांनी सांगितलं