राजकारण

मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान कोरोनाच्या विळख्यात!

25 July :- कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव दिवसेंदिवस चिंताजनक होत चालला आहे.गरीब-श्रीमंत,सेलिब्रेटी,खेळाडू,राजकीय नेते,अधिकारी एकंदरीत सर्वच कोरोना विषाणूच्या चपेटीत सापडत आहे.आताच हाती आलेल्या माहितीनुसार मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान कोरोनाच्या विळख्यात सापडले आहेत.

चौहान यांनी स्वत: ट्विट करुन याबाबतची माहिती दिली आहे.माझ्या प्रिय देशवासियांनो, माझ्यात कोरोनाची लक्षणं दिसून येत होती. कोरोनाची चाचणी घेतल्यानंतर माझा अहवाल सकारात्मक(पॉझिटिव्ह) आला आहे. माझ्या सर्व सहकाऱ्यांना मी अहवान करतो की त्यांनी आपली कोविड-१९ चाचणी करुन घ्यावी. शिवाय माझ्यासोबत संपर्क आलेल्या निकटवर्तीयांनी विलगीकरणात राहावे, असं चौहान ट्विटमध्ये म्हणाले आहेत.मी कोरोना विषाणूच्या सर्व नियमांचे काटेकोर पालन करत आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार स्वत:ला विलगीकरणात ठेवेन आणि उपचार घेईन. माझे मध्य प्रदेशच्या जनतेला आवाहन आहे की सावधानता बाळगा, थोडाही बेजबाबदारपणा कोरोनाला निमंत्रण देऊ शकतो.

मी कोरोनापासून वाचण्यासाठी सर्व ते प्रयत्न केले, पण आपली समस्या घेऊन लोक मला भेटायला यायचे. त्यामुळे त्यांना भेटणे मला अनिवार्य होते. मला ज्या कोणी लोकांनी भेट दिली, त्या सर्वांनी आपली कोविड-१९ चाचणी करुन घ्यावी, असं शिवराज सिंह चौहान म्हणाले आहेत.