१ ते १२ वीच्या विद्यार्थ्यांना दिलासा; अभ्यासक्रमात २५% होणार कपात!
25 July:- राज्यात सर्वत्र कोरोनाचा कहर सुरु आहे.दिवसेंदिवस वाढणारी कोरोनाबाधित रुग्णांची आकडेवारी येणाऱ्या काळातील मोठ्या संकटाचे संकेत असल्याचे वाटू लागले आहे.अशा भयाण परिस्थितीमध्ये शाळा सुरु करणे म्हणजे विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी खेळण्या सारखे आहे. शैक्षणिक वर्ष 15 जूनपासून सुरू करण्यात आले आहे.वरून शाळा बंद आहेत.
सीबीएसईने 30 टक्के अभ्यासक्रम कमी केल्यानंतर आता राज्य शिक्षण मंडळाने सुद्धा कमी करावा अशी मागणी पालक, शिक्षकांकडून केली जात होती. या मागणीचा गांभीर्याने विचार करत आता शिक्षण विभागानेही पहिली ते बारावी पर्यंतचा अभ्यासक्रम 25 टक्के कपात करून विद्यार्थ्यांना दिलासा दिला आहे.कारण दहावी आणि बारावी बोर्डाचा अभ्यास करताना अभयसक्रम लवकर संपवण्याचा प्रयत्न असतो. त्यात आता अभ्यासक्रम कमी केल्याने वेळेत अभ्यासक्रम पूर्ण करणे शक्य होईल. अभ्यासक्रमाची यादी संचालक, राज्य शैक्षणिक व संशोधन परिषद यांच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून दिली जाणार आहे.
शाळा अद्याप सुरु न झाल्यामुळे विद्यार्थ्यांच्या मनात तणाव किंवा दडपण येऊ नये, यासाठी पहिली ते बारावी पर्यंतचा अभ्यासक्रम कमी करण्याच्या निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे, असं राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी म्हटलं आहे.