गेवराई- कोरोनाच्या धास्तीने घेतला एकाचा बळी
25 july :- कोरोना कहर फक्त देशात,राज्यात,जिल्ह्यात,शहरात,ग्रामीण भागातच नाही तर माणसांच्या मनात सुद्धा भीतीरुपी सुरु आहे.कोरोना विषाणूचा संसर्ग झाल्यावर मृत्यू होवो अथवा न होवो कोरोनाच्या धास्तीने मात्र अनेक लोकांचा मृत्यू होत आहे हे नक्की.
गेवराई तालुक्यातील धोंडराई येथील रहिवासी व सध्या गेवराई शहरातील अहिल्या नगर येथे वास्तव्यास असलेले प्रकाश बाळकृष्ण गायकवाड पुणे येथे नोकरीस होते. कोरोनाच्या वाढत्या फैलावामुळे ते गेवराई शहरातील आहिल्यानगर येथे गेल्या तीन महिन्यांपूर्वी परत आले होते. त्यानंतर त्यांचा आठ दिवसांपूर्वी कोरोना तपासणीसाठी स्वॅब घेतला होता. त्याच्या रिपोर्ट निगेटिव्ह आला होता.
मात्र, आपल्याला कोरोना झाला आहे, अशी समजूत झाल्याने त्यांनी स्वत:ला एका खोलीत क्वॉरंटाईन केले होते. त्यांच्या मनातील कोरोनाची भिती वाढत गेली. त्या भितीकीमुळेच त्यांनी शनिवारी पहाटे 5 वाजण्याच्या सुमारास राहत्या घराच्या दुसऱ्या मजल्यावरील स्लॅबच्या हुकाला दोरी बांधून गळफास घेत आत्महत्या केली. आत्महात्येपूर्वी त्यांनी दोन्ही हातांच्या नसा ब्लेडने कापल्या होत्या. गेवराई उपजिल्हा रुग्णालयात मतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. गेवराई पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली आहे.