सोनू सूद करणार ‘वॉरिअर आजीं’ची मदत!
25 July :- हिंदी चित्रपट सृष्टीत अनेक खलनायकाच्या भूमिका साकारणारा सोनू सूद प्रत्यक्ष आयुष्यात सर्वांमध्ये हिरो बनत आहे.अक्षय कुमार,सलमान खान यांच्या नंतर समजजसेवेमध्ये आपले योगदान देणारा सोनू सूद समाजातील अनेकांच्या गळ्यातील ताईत बनला आहे. सोनूने मजुरांना त्यांच्या घरी पोहोचवण्यापासून मुंबई पोलिसांना फेस शिल्ड देण्यापर्यंत अनेक वेळा मदतीचा हात पुढे केला आहे. दरम्यान सोनू आता सोशल मीडियावर गेल्या एक दोन दिवसात व्हायरल झालेल्या ‘वॉरिअर आजीं’ची मदत करणार आहे. त्याने या संदर्भात ट्वीट देखील केले आहे.
या आजीबाई कोरोनाच्या संकटात पोट भरण्यासाठी रस्त्यावर लाठीकाठीचं प्रात्यक्षिक दाखवत होत्या. या कठीण प्रसंगातही त्यांची जिद्द अनेकांच्या पसंतीस उतरल्यामुळे सोशल मीडियावर हा व्हिडीओ बराच व्हायरल झाला आहे. अभिनेता रितेश देशमुखने देखील या आजींचा व्हिडिओ शेअर केला होता.दरम्यान प्रसिद्ध नेमबाज असणाऱ्या आजी चंद्रो तोमर ज्यांच्यावर सांड की आँख हा सिनेमा बनला आहे यांनी देखील या ‘वॉरिअर आजीं’चा व्हिडीओ शेअर केला होता. तो व्हिडीओ रिट्वीट करत सोनूने या आजींना मदत करण्याची इच्छा व्यक्त केली आहे.त्याने या आजीबाईंची सविस्तर माहिती देण्याचे आवाहन केले आहे. त्याचप्रमाणे मदतीची घोषणा देखील केली आहे.
या ट्वीटमध्ये सोनू असे म्हणाला आहे की, ‘या आजींबरोबर एक प्रशिक्षण शाळा उघडायची आहे ज्याठिकाणी त्या देशातील महिलांना स्वत:चे संरक्षण करण्यासाठी प्रशिक्षण देतील’