नरेंद्र मोदी साधणार संवाद राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी!
24 जुलै :- देशात सर्वत्र वाढत असणारी कोरोनबाधितांची संख्या चिंताजनक आहे.लॉकडाऊन नंतर आता देशात अनलॉकची प्रक्रिया सुरु झाली आहे. त्याचे दोन टप्पे झाले असून आता तिसऱ्या टप्प्याचा अनलॉक 3 विचार सुरू आहे.याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी देशातल्या मुख्यमंत्र्यांशी पुन्हा एकदा बोलणार आहेत. येत्या सोमवारी 27 जुलै ते सर्व मुख्यमंत्र्यांशी संवाद साधनार असल्याची माहीती समोर आली आहे.
कोरोना बरोबर देशाची आर्थिक व्यवस्था सुधारण्याच्या दृष्टिकोनातून सक्षम पाऊल उचलने गरजेचे आहे.सर्व सामान्य नागरिकांना अनेक ठिकाणी आर्थिक अड्चनींना तोंड द्यावे लागत आहे.आशा परिस्थितीमध्ये अर्थव्यवस्थेची स्थिती लक्षात घेता आता पुन्हा व्यापक लॉकडाऊन करण्यात येणार नाही असं केंद्र सरकारने स्पष्ट केलं.
राज्यांना काय समस्या आहेत ते पंतप्रधान ऐकून घेणार असून पुढची दिशा ठरवली जाणार आहे.