शरद पवारांनी दिला फडणवीसांना महत्वपूर्ण सल्ला!
24 जुलै :- नाशिक जिल्ह्यातील कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आढावा बैठक घेतली.राज्यभर कोरोनाच्या परिस्थितीचा आढावा घेत असून त्यावर मुख्यमंत्री धरोणात्मक निर्णय घेत असल्याचे शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
नाशिकला राज्याचं आरोग्य विज्ञान विद्यापीठ आहे, मात्र इथेच डॉक्टर सेवा बजावत नसतील तर गंभीर आहे. आपत्ती व्यवस्थापन कायद्याअंतर्गत कारवाई करण्यची वेळ डॉक्टरांनी आणू नये असा इशारा पवार यांनी दिला. आम्ही राजकारण करत नाही, देवेंद्र फडणवीस आणि इतरांनी करू नये असा सल्लाही त्यांनी दिला.आपत्ती व्यवस्थापन कायद्याचा वापर करण्याची वेळ डॉक्टरांनी आणू नये, कर्तव्य बजवावे.
जास्त पैसे आकारतात त्यांचे ऑडिट होत असून यापुढे कडक तपासणी होणार आहे, असं राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटलं. देवेंद्र फडणवीस आणि भाजपने राजकारण करू नये, असंही शरद पवार यांनी म्हटलं.