क्रीडा

IPL खेळण्यास धोनी सज्ज!

24 जुलै :- इंग्लंडमध्ये 2019 साली पार पडलेल्या विश्वचषक स्पर्धेत महेंद्रसिंह धोनी जेव्हा रनआऊट झाला त्यावेळी संपूर्ण भारतीयांची निराशा झाली होती. न्यूझीलंडविरुद्धच्या उपांत्य फेरीच्या सामन्यातील पराभवामुळे विश्वचषकातील भारतीय संघाचं आव्हान संपुष्टात आलं. या संपूर्ण स्पर्धेत धोनीचा संथ खेळ हा चर्चेचा विषय ठरला होता. विश्वचषक स्पर्धेनंतर धोनी थेट आयपीएलच्या मैदानावर दिसणार होता.

आयपीएल 2020 साठीच्या तयारीसाठी प्रत्येक संघाने तयारीला सुरुवात केली होती. प्रत्येक जण मैदानात कसून सराव करताना दिसून आला. यावेळी धोनेही आयपीएलसाठी कसून सरावाला सुरुवात केली. नेट्समध्ये सराव करताना धोनी षटकार आणि चौकार मारत असत. धोनीला पुन्हा एकदा सराव करताना पाहून चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण होते. यावेळी गेल्या 10वर्षात पहिल्यांदाच धोनीला एवढ्या एकाग्रतेने सराव करताना पाहिल्याचं चेन्नई संघाच्या फिजिओंनी सांगितलं. पण कोरोमुळे धोनीने चेन्नईला रामाराम करत धोनीला रांचीला परतावं लागलं.

धोनीने यंदा आयपीएलसाठी कसून मेहनत केली होती. गेल्या 10 वर्षांत धोनी पहिल्यादांच एवढे परिश्रम घेताला दिसून आला होता. गेल्या वर्षी चेन्नई संघात सामील झालेला चावलाने देखील धोनी सरावासाठी खूप मेहनत घेत असल्याचं सागितलं. तसेच सराव सामन्यातील फलंदाजीत धोनीचा सराव दिसून आल्याचं देखील बोलला.